शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खंडविकास अधिकाऱ्यास मारहाण

By admin | Updated: May 30, 2015 02:52 IST

ग्रामसभेला अधिकारी पाठविण्याची विनंती करूनही अधिकारी न पाठविल्यामुळे संतापलेल्या धानला येथील ग्रामस्थांनी खंडविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याला मारहाण केली.

मौदा : ग्रामसभेला अधिकारी पाठविण्याची विनंती करूनही अधिकारी न पाठविल्यामुळे संतापलेल्या धानला येथील ग्रामस्थांनी खंडविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याला मारहाण केली. मौदा पंचायत समिती कार्यालयात हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडला. मारहाणीत खंडविकास अधिकाऱ्यांच्या डोक्याला दुखापत झाली.चिंधू विठोबा आदमने असे जखमी झालेल्या खंडविकास अधिकाऱ्यांचे तर एस.जे. पाटील असे विस्तार अधिकाऱ्यांचे नाव आहे. शुक्रवारी धानला ग्रामपंचायतीची सभा होती. या सभेला सचिव दर्शना संदीप गायकवाड या सुटीवर असल्याची जाणीव असल्याने सरपंच अशोक पत्रे यांनी खंडविकास अधिकारी आदमने यांच्याकडे कुणीतरी अधिकारी सभेला पाठविण्यासंदर्भात निवेदन मंगळवारीच दिले होते. सभेची नियोजित वेळ निघून गेली तरीही एकही अधिकारी सभास्थळी आलेला नव्हता. त्यानंतर सरपंचांनी खंडविकास अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा केली असता पाच-दहा मिनिटात अधिकारी येत आहे, अशी टाळाटाळ केली. पुन्हा काही वेळानंतर विचारले असता तेच उत्तर मिळाले. तोपर्यंत सभास्थळी मोठ्या संख्येने धानला येथील ग्रामस्थ एकत्र आले होते. अधिकारी येण्याची सूतराम शक्यता नसल्याचे पाहून सरपंच पत्रे यांनी सभा सुरू केली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ही सभा संपून २५५ नागरिकांनी प्रोसेडिंग बुकवर सह्या केल्या. या सभेतही अधिकाऱ्यांविरुद्ध नागरिकांमध्ये संताप दिसून आला. सभा संपल्यानंतर लगेच २५-३० ग्रामस्थांनी मौदा पंचायत समिती गाठले. खंडविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन सरपंच पत्रे यांनी झालेल्या सभेची माहिती देत कॅशबुक, हिशेबात गोंधळ असल्याचे खंडविकास अधिकाऱ्यांना सांगत चौकशी करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना दिले. मात्र खंडविकास अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाची प्रत त्यांच्यासमोरच फाडून फेकली. त्यामुळे धानला येथून आलेल्या ग्रामस्थांमध्ये असलेला असंतोष उफाळला आणि त्यांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यात खुर्च्या, टेबलची नासधूस केली तर साहित्य इतरत्र फेकले. तसेच खंडविकास अधिकारी आदमने आणि विस्तार अधिकारी पाटील यांना धक्काबुक्की केली. त्यात खंडविकास अधिकाऱ्यांच्या डोक्याला दुखापत झाली. याबाबत खंडविकास अधिकाऱ्यांनी मौदा पोलीस ठाण्यात धानल्याचे सरपंच अशोक पत्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, माजी सरपंच अजय हारोडे यांच्यासह २५-३० महिला पुरुषांविरुद्ध तक्रार नोंदविली.