आंबेडकर स्मारकासाठी रिपाइं सेक्युलरचा रास्ता रोको

By Admin | Updated: October 23, 2016 02:36 IST2016-10-23T02:36:49+5:302016-10-23T02:36:49+5:30

पटवर्धन मैदानावर प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक २५ वर्षांपासून प्रलंबित का,

Stop the path to the Rapid Secular for Ambedkar memorial | आंबेडकर स्मारकासाठी रिपाइं सेक्युलरचा रास्ता रोको

आंबेडकर स्मारकासाठी रिपाइं सेक्युलरचा रास्ता रोको

नागपूर : पटवर्धन मैदानावर प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक २५ वर्षांपासून प्रलंबित का, असा प्रश्न उपस्थित करीत याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(सेक्युलर)तर्फे इंदोरा चौकात निदर्शने करीत रास्ता रोको करण्यात आला. शहर अध्यक्ष दिनेश अंडरसहारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्ह्यात दलितांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच एकनाथ निमगडे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनात दीपक डोंगरे, प्रमोद वंजारी, मनीषा लोणारे, अभिजित मेश्राम, आकाश हिवराळे, लालूराम शाहू, अ‍ॅड. महेश शाहू, भावेश गेडाम, ताराचंद्र रामटेके, मुन्ना शाहू, रुपम दोडके, लता अहिरे, संजय अंडरसहारे, विक्की करवाडे, सिद्धार्थ जवादे, उज्ज्वल निमगडे, गौरी पेरले, गौरव वासनिक, राहुल फुलके आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Stop the path to the Rapid Secular for Ambedkar memorial