शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्र विश्वस्तांसाठी राजकीय फिल्डिंग

By admin | Updated: July 18, 2014 01:11 IST

नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अनंतराव घारड व किशोर कन्हेरे यांचा विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोरात राजकीय फिल्डिंग लावली आहे.

काँग्रेसकडून धवड, पन्नासे, तिडके, वंजारी : राष्ट्रवादीतून पाटील- आर्य स्पर्धेत नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अनंतराव घारड व किशोर कन्हेरे यांचा विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोरात राजकीय फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासाठी जोरात सक्रिय झाले आहे. काँग्रेस नेत्यांच्या फारशा हालचाली सुरू असल्याचे दिसत नसले तरी प्रयत्न शर्तीचे सुरू आहेत.नासुप्रमध्ये आमदारांचा प्रतिनिधी, नगरसेवकांचा प्रतिनिधी, स्थायी समिती अध्यक्ष यांना विश्वस्त बनविले जाते. दोन सदस्यांची नियुक्ती राज्य सरकार करते. या दोनपैकी एक-एक पद काँग्रेस- राष्ट्रवादीने वाटून घेतले आहे. यापूर्वी काँग्रेसकडून अनंतराव घारड तर राष्ट्रवादीकडून किशोर कन्हेरे हे विश्वस्त होते. त्यांचा कार्यकाळ १८ जून रोजी संपला. यानंतर कन्हेरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश घेतला. घारड पुन्हा इच्छुक नाहीत. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी इच्छुक समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या कोट्यातून माजी आमदार अशोक धवड यांचे नाव आघाडीवर आहे. धवड शहर अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पण संधी हुकली. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या गटाकडून बाबुराव तिडके व मुकुंदराव पन्नासे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. निष्ठावान व जुन्या काँग्रेसीला संधी द्यावी, असा मुद्दा समोर करण्यात येत आहे. दक्षिणच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अ‍ॅड. अभिजित वंजारी हे देखील शर्यतीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील व माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्यात जोरात रस्सीखेच सुरू आहे.सुरुवातीला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांचेही नाव होते. पण ते मागे पडले. विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते हा विषय सध्या प्रलंबित राहिला तर बरे होईल, या मताचे आहेत. विश्वस्तपद मिळाले तर तिकीट मिळणार नाही, या धास्तीने अनेकांनी इच्छा असूनही दावा केलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोट्यात शहरातील एकही जागा नसल्यामुळे तेथे विश्वस्त पदासाठी उघड स्पर्धा पहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)