शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचे काऊंटडाऊन सुरू

By admin | Updated: July 7, 2015 02:11 IST

१ आॅगस्टपासून एलबीटी रद्द होण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

२४ दिवसांचा अवधी : मनपा कर्मचारी व व्यावसायिकांमध्ये संभ्रमनागपूर : १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द होण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार एलबीटीएवढी अन्य पर्याय वा अनुदानाची घोषणा राज्य सरकारने अद्यापही केलेली नाही. याशिवाय मनपाचे उत्पन्नाचे स्रोत कोणते असेल, ही स्थितीही अस्पष्ट असल्यामुळे मनपा कर्मचारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रम पसरला आहे. ठोस निर्णय नसल्याने चिंताएलबीटी वसुली बंद होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. ‘डेडलाईनला’ २४ दिवस उरले आहेत. जीएसटी लागू होईपर्यंत राज्य सरकार एलबीटी सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी व्यापाऱ्यांना शंका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.राज्य सरकारची आर्थिक स्थिती सक्षम नाहीअनेक विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास विलंब होत आहे. एलबीटी रद्द होण्याच्या घोषणेनंतर मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रत्येक महिन्यात ६० कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी महापौर प्रवीण दटके यांच्यासह सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. एलबीटी रद्दच्या सूचना नाहीतमनपाला ५ जुलैपर्यंत एलबीटीच्या माध्यमातून ९१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. गेल्यावर्षी ३० जूनपर्यंत ७८ कोटी रुपये एलबीटीद्वारे मिळाले होते. गेल्या वित्तीय वर्षात एलबीटीच्या माध्यमातून ३३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाला मिळाले. एलबीटी संदर्भात राज्य सरकारने अद्याप काहीही सूचना वा माहिती दिलेली नाही, असे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. पर्यायी व्यवस्था लागू कराजकातऐवजी एलबीटी लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने आठ महिन्यांपूर्वीच केली होती. तशी सूचना मनपाला देण्यात आली होती. शिवाय डिसेंबरमध्ये एलबीटी लागू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक मनपाने जारी केले होते. तीन महिन्यांनंतर १ एप्रिलपासून एलबीटी लागू करण्यात आला होता.