शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचा मनपाला झटका

By admin | Updated: June 11, 2015 03:01 IST

शहर बस सेवेसाठी मोरभवनची जागा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे.

मोरभवनातील भूमिपूजन कार्यक्रम रद्द : मनपाने एसटीची परवानगीच घेतली नाहीनागपूर : शहर बस सेवेसाठी मोरभवनची जागा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे. महापालिकेतर्फे गुरुवारी मोरभवनातील तीन प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी महापौरांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार होते. मात्र, यासाठी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे. वृत्तपत्रांच्या माध्यमातून भूमिपूजनाचे वृत्त कळताच एसटी ने बुधवारी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले. यावर उत्तर देताना आयुक्तांनी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. मोरभवनच्या जागेवरून एसटी व महापालिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून रस्सीखेच सरू आहे. जागा वाचविण्यासाठी एसटीने मोरभवन येथून ग्रामीण बस फेऱ्या सुरू केल्या. शहरातील १६ ठिकाणी असलेल्या बस स्टॅण्डची मालकीही सोडली नाही. यामुळे शहर बस रस्त्यावर पार्क केल्या जात आहेत. १५ आॅक्टोबर २००८ रोजी महापालिकेच्या सभेत ठराव मंजूर करीत मोरभवनला सिटी ट्रान्सपोर्ट स्टॅण्डचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. २४ डिसेंबर २०१० च्या सभेत पुन्हा हा प्रस्ताव पारित करण्यात आला. या प्रस्तावात महापालिकेने शहरातील सर्वच एसटी स्टॅण्ड महापालिकेला सोपविण्यासाठी नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. यावर राज्य सरकार ने नगर रचनेच्या माध्यमातून सूचना व आक्षेप मागविले. मात्र, आजवर सूचना व आक्षेप मिळाले नाही. या आधारावर २९ आॅक्टोबर २०१२ रोजी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, काहीच कार्यवाही न झाल्यामुळे समस्या कायम राहिली. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नगर विकास मंत्रालयाने अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. लवकरच अधिसूचना जारी होणार आहे. असे असले तरी मोरभवनचा ताबा वाचविण्यासाठी एसटी महामंडळाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)मालकी एसटीची एसटीचे स्टॅण्ड व डेपोची मालकी एसटीची आहे. याबाबत बुधवारी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले होते. या पत्राच्या उत्तरात त्यांनी फोन करून कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यानंतरही मोरभवनमध्ये भूमिपूजन करण्यात आले तर राज्य सरकारला पत्र पाठवून तक्रार केली जाईल. भूमिपूजन कार्यक्रमाची कुठलीही माहिती एसटी महामंडळाला नव्हती. बुधवारी वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवरून ही माहिती मिळाली. - राजीव घाटोळे, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर