शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एम्सच्या निर्माण कार्यासाठी जागेचे हस्तांतरण

By admin | Updated: July 13, 2015 02:28 IST

मिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभी राहणार आहे.

गोल्फ कोर्सच्या जागेवर होणार एम्स : निर्माण कार्याची जबाबदारी एचएससीसीचीसुमेध वाघमारे / राजीव सिंग नागपूरमिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभी राहणार आहे. ‘एम्स’च्या निर्माण कार्यासाठी ही जागा ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ला, (एचएससीसी) हस्तांतरित करण्याच्या तयारीला वेग आला आहे. त्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला प्रस्तावित जागेवर पाणी, वीज व चौपदरी रस्ता उपलब्ध करून द्यायचे आहे.२०१४-१५च्या अर्थसंकल्पात देशात चार नवीन एम्स उभारण्याच्या निर्णयानंतर लगेचच केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये ‘एम्स’ नागपुरात होत असल्याची घोषणा केली. सुरुवातीला हा प्रकल्प मेडिकलच्या टीबी वॉर्डासह, मध्यवर्ती कारागृहामागील जागा, लघु सिंचन विभागाची जागा आणि मेडिकलच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील वैद्यकीय वसाहतीची अशी एकूण साधारण २०० एकर जागेवर उभारण्याचे प्रस्तावित होते. परंतु या जागेवर असलेले विविध विभाग हलविणे खर्चिक आणि वेळखाऊ होते. दरम्यानच्या काळात एम्सच्या अभ्यास मंडळाने मिहानमधील जागेचाही शोध घेतला. मिहान आणि टीबी वॉर्ड असे दोन्ही ठिकाणी एम्सचा विचार सुरू झाला. याला घेऊन १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव के. सी. सामरीया यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय पथकाने टीबी वॉर्ड व मिहानमधील जागेची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी टीबी वॉर्डाच्या जागेला जागेवरच नापसंती दिली. अशी मिळाली १५० एकर जागामे महिन्यात मुंबईमध्ये ‘एम्स’ व महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (एमएडीसी) प्रतिनिधींची बैठक झाली. यात मिहानमधील ‘सेझ’ बाहेर सरकारी संस्थांना जमीन देण्यासाठी निविदेची गरज नाही, असा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याआधारे ‘एम्स’ साठी १५० एकर जागा राखीव ठेवण्यात आली. पूर्वी ही जागा गोल्फ कोर्ससाठी ठेवण्यात आली होती.