शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय पगारात समाधान

By admin | Updated: June 10, 2015 03:01 IST

बल्लमवार सरांना उन्हाळ्याच्या सुटीत किंवा एरव्हीही खासगी ट्युशन क्लासेस घेऊन आर्थिक गणित जुळविता आले असते.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ‘गणित’ जुळविणारे सर ! नागपूर : बल्लमवार सरांना उन्हाळ्याच्या सुटीत किंवा एरव्हीही खासगी ट्युशन क्लासेस घेऊन आर्थिक गणित जुळविता आले असते. पण मिळणाऱ्या शासकीय पगारात ते समाधानी आहेत. उलट जेवढा पगार मिळतो त्यातुलनेत आम्ही शिकवीतही नाही, असे ते मोकळेपणाने सांगून त्यांनी पगारासाठी रडणाऱ्या व अध्यापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना अप्रत्यक्षपणे चपराकही लगावली. सर्वच विद्यार्थ्यांची दर शनिवारी गणिताची टेस्ट घेतली जाते. यात आढळलेल्या चुका संबंधित विद्यार्थ्यांना सोडवून दिल्या जातात. शहरातील विविध खासगी ट्युशनमध्ये घेतले जाणारे टेस्ट पेपर, प्रश्नसंच ते मिळवितात. त्यासाठी धडपड करतात व ते प्रश्न आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतात. त्यांची पक्की तयारी करून घेतात. वारंवार गणित सोडवून घेऊन बल्लमवार सर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे गणित पक्के करण्याचा प्रयत्न करतात. सरांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम...!इतर शिक्षकांनीही घ्यावा पुढाकार सर्वच शिक्षकांना पगार मिळतो. मात्र, बल्लमवार यांच्यासारखे काही शिक्षक मिळणाऱ्या पगारात समाधान मानून अतिरिक्त अध्यापनाचे काम करतात. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतात. महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनीही असाच पुढाकार घेतला तर गरिबाघरच्या गुणवंतांनाही पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल. तुम्ही घडविलेला विद्यार्थी एखाद्या मोठ्या हुद्यावर जाऊन जेव्हा तुम्हाला वाकून नमन करेल तो क्षण तुमच्या आयुष्यात कुठल्याही अतिरिक्त मानधनापेक्षा निश्चितच मोठा असेल. (प्रतिनिधी)उपाशीपोटी कसा करणार अभ्यास?शिक्षक बल्लमवार यांनी या गरीब विद्यार्थ्यांची आणखी एक अडचण सांगितली. मुलांचे आई-वडील सकाळीच कामावर निघून जातात. ते घरी दुपारी १२ च्या सुमारास परत येतात. शाळा सकाळी ११.४५ ची असते. शाळेत जाण्याच्या वेळेपर्यंत घरात स्वयंपाक झालेला नसतो. त्यामुळे ही मुले उपाशीपोटीच शाळेत येतात. दोन पिरेड झाले की मधल्या सुटीत १० मिनिटात घरी जावून जेवण करून येतात. ते उपाशीपोटी कसे शिकणार? ही परिस्थिती माहिती असल्यामुळे ते अभ्यासात चुकले तरी शिक्षा केली जात नाही. अशावेळी आपण त्यांना भूमितीशी संबंधित काही आरेखन काढण्याचे काम सोपवून त्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. आहारासाठी संस्था, उद्योजकांनी पुढाकार घ्यावाशालेय पोषण आहाराअंतर्गत ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते. ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही. मात्र, महापालिकेच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी गरीब असतात. त्यांना घरी भोजनही मिळत नाही. त्यामुळे येथील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील संस्था, संघटना, उद्योगपती किंवा महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.