शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभाग एसआयटीच्या धसक्यात

By admin | Updated: September 8, 2016 19:42 IST

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काचे प्रदान या योजनांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 8 - सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काचे प्रदान या योजनांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये एसआयटीमार्फत अधिकारी कर्मचाऱ्यांचा छळ होत आहे.एसआयटीच्या पुढे कुठल्याही अधिकाऱ्याची सुनावणी होत नाही, थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया एसआयटी अवलंबित आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी धास्तीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, मुख्य सचिव यांच्यापुढे अधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्यानंतरही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यभर सामाजिक न्याय विभागात शासनाविरुद्ध संताप व्यक्त होत असून, अधिकारी व कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेच्या चौकशीकरिता नियुक्त विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याकरिता जो शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यात अनियमितता शोधून काढणे व अनियमितता न होण्याकरिता उपाययोजना सुचविणे एवढेच विशेष चौकशी पथकाच्या कामाचे स्वरूप नमूद केले आहे. परंतु एसआयटी स्वत:ची कार्यकक्षा ओलांडून गुन्हे नोंदविण्याचे आदेश देत आहे. एसआयटीच्या आदेशावर सचिव व आयुक्त हे समाज कल्याण विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना शैक्षणिक संस्थेवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश देत आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार अतिशय दोषपूर्ण असून अधिकारी, कर्मचारी एसआयटीमुळे धास्तीत आहे. शासनाकडे निवेदन देऊनसुद्धा दखल झाली नाही. त्यामुळे १ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून आंदोलन सुरू आहे. तरीही शासनाने दखल न घेतल्यामुळे १२ सप्टेंबरपासून राज्यभरात सामाजिक न्याय विभागात लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.