एसजेएएन 'मीडिया वॉकथॉन' १ जून रोजी

By Admin | Updated: May 9, 2014 02:36 IST2014-05-09T02:27:39+5:302014-05-09T02:36:29+5:30

स्पोर्टस् र्जनलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्यावतीने (एसजेएएन) मीडिया कर्मचाऱ्यांसाठी वॉकथॉनचे आयोजन १ जून रोजी करण्यात येत आहे.

SJAN 'Media Walkthon' on June 1 | एसजेएएन 'मीडिया वॉकथॉन' १ जून रोजी

एसजेएएन 'मीडिया वॉकथॉन' १ जून रोजी

नागपूर: स्पोर्टस् र्जनलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्यावतीने (एसजेएएन) मीडिया कर्मचार्‍यांसाठी वॉकथॉनचे आयोजन १ जून रोजी करण्यात येत आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष असून गतवर्षी या आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने यंदा मोठय़ा प्रमाणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मेघे ग्रूप हे या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते असून ' वॉक फॉर हेल्थ' हे आयोजाचे ब्रीदवाक्य राहील.
मीडिया कर्मचार्‍यांचे आयुष्य सतत धकाधकीचे असल्याने तब्येतीकडे दुर्लक्ष होते. आरोग्य चांगले रहावे यासाठी नियमित चालण्याची सवय असावी या हेतूने एसजेएएनने गतवर्षीपासून हा उपक्रम सुरू केला. ५0 वर्षांखालील पुरुष व ५0 वर्षांवरील पुरुष गटासाठी चार किमी अंतर आणि महिलांसाठी दोन किमी अंतर चालण्याची शर्यत असून यात मीडिया कर्मचार्‍यांच्या पत्नींना देखील सहभागी होता येईल. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावरुन सकाळी ६.१५ वाजता वॉकथॉनला प्रारंभ होईल. परिसरात अंतर पूर्ण केल्यानंतर त्याच ठिकाणी वॉकथॉनची सांगता होईल.
सहभागी सर्व स्पर्धकांना आयोजन समितीच्यावतीने टी शर्ट आणि कॅप्स देण्यात येतील. याशिवाय सर्व गटातील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पुरस्कार दिले जातील. प्रवेश शुल्क ५0 रुपये असून सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे २८ मे पर्यंत आपापल्या वृत्तपत्रातील क्रीडा विभागात नोंदवावीत असे, एसजेएएन सचिव किशोर बागडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: SJAN 'Media Walkthon' on June 1