शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

बोर राज्यातील सहावे टायगर रिझर्व्ह!

By admin | Updated: May 13, 2014 00:56 IST

वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्....

योगेंद्र शंभरकर - नागपूर

वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. माहिती सूत्रानुसार, यासंबंधी पुढील आठवडाभरात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे वन विभागाने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी पेंच कार्यालयाचे विभाजन करून वनसंरक्षक दर्जाचे नवीन पद निर्माण करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या नवीन पदाला मंजुरी मिळताच बोर व्याघ्र प्रकल्पासह टिपेश्‍वर व पैनगंगा अभयारण्याचा कार्यभार या नवीन अधिकार्‍यांकडे सोपविला जाईल. मात्र बोर व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य कार्यालय नागपुरातच राहणार आहे. सध्या बोर अभयारण्याचे व्यवस्थापन पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक कार्यालयाच्या अधिकारात आहे. याशिवाय या कार्यालयाकडे पेंच व्याघ्र प्रकल्प, मानसिंगदेव, उमरेड-कर्‍हांडला, टिपेश्‍वर व पैनगंगा अभयारण्याचीही जबाबदारी आहे. कदाचित हा भार लक्षात घेता, बोर व्याघ्र प्रकल्पासाठी स्वतंत्र वनसंरक्षक कार्यालय तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.

अशी झाली घोषणा

विदर्भातील नवीन व्याघ्र प्रकल्पासंबंधी माजी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी राज्याच्या वन विभागाला गत सप्टेंबर २00९ मध्ये पत्र पाठविले होते. यानंतर १३ सप्टेंबर २0१३ रोजी जयराम रमेश नागपूर दौर्‍यावर असताना विदर्भातील नागझिरा-नवेगाव व बोर व्याघ्र प्रकल्प तयार करण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या त्या पत्रावर १८ सप्टेंबर २0१0 रोजी केंद्र सरकारकडून बोर व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यासंबंधी शिफारस करण्यात आली होती.

राज्याचा प्रस्ताव

वन विभागाने गत काही दिवसांपूर्वी बोरमधील १३ हजार ८१२ हेक्टर वन क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. यानंतर राज्याने तो प्रस्ताव अतिरिक्त महासंचालक (व्याघ्र प्रकल्प) व सदस्य सचिव केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाकडे सादर केला होता.