शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

पेंचसह आता बोर, कऱ्हांडलामध्येही आता जिप्सीत सहा पर्यटकांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सीमध्ये सहा पर्यटकांना परवानगी मिळाल्यानंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व कऱ्हांडला ...

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सीमध्ये सहा पर्यटकांना परवानगी मिळाल्यानंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व कऱ्हांडला या दोन अभयारण्यांतही पर्यटकांना जिप्सीतून सहा व्यक्तींना फिरण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच कँटरमध्ये बसणाऱ्या पर्यटकांच्या वाढीव संख्येतही परवानगी वाढविली आहे. येथील पर्यटन सुरू झाल्यापासूनही कोरोना संक्रमणाच्या कारणामुळे जिप्सीतून केवळ चार व्यक्तींनाच फिरण्याची परवानगी होती.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये काही दिवसांपूर्वीच स्थानिक प्रशासनाने सफारीत सहा पर्यटकांना जिप्सीतून फिरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे अन्य प्रकल्पांमधूनही ही मागणी पुढे येत होती. जिप्सीचालक आणि गाइड्‌सकडूनही या संदर्भात मागणी करण्यात आली होती. कोरोनामुळे व्यवसाय खालावल्याने आणि आता संक्रमणात बरीच घट झाल्याने ही बंदी हटविण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हे आदेश काढले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने ठाकरे यांनी नियम, अटींच्या अधीन राहून ही परवानगी दिली आहे. यानुसार पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व कऱ्हांडला या दोन अभयारण्यांत जिप्सीमध्ये चारऐवजी सहा पर्यटक पर्यटन करू शकतील. कँटर बसमधून पर्यटन करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ केली आहे. २४ सीटर कँटरमध्ये २० पर्यटक आणि १८ सीटर कँटरमधून १५ पर्यटकांना परवानगी देण्यात आली आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये ७ गेट असून दरररोज सकाळ-सायंकाळ १६९ जिप्सी पर्यटकांना सेवा देतात, तर कऱ्हांडलामध्ये चार गेटवरून सकाळ-सायंकाळ मिळून ९८ जिप्सी पर्यटकांच्या सेवेत असतात. बोर अभयारण्यातही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत असतात.

...

पेंचकडे कल अधिक

ताडोबानंतर विदर्भातील पर्यटकांचा पेंच व्याघ्र प्रकल्पावर अधिक भर असतो. पेंचमध्ये ७ गेट असून सकाळ व सायंकाळ मिळून प्रत्येकी ८५ व ८४ अशा १६९ जिप्सी सेवा देतात. कोरोना संक्रमणाच्या नियमानंतर येथे चार पर्यटकांनाच एका जिप्सीतून पर्यटनाची परवानगी होती. या हिशेबाने ६७६ व्यक्ती रोज वनभ्रमंती करीत असत. क्षमता असूनही कोरोना संक्रमणाच्या नियमामुळे ३३८ वंचित राहायचे. या निर्णयामुळे पर्यटक सुखावले आहेत.

...