शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

एकटा पुरुष झटापटीशिवाय बलात्कार करू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:58 IST

नागपूर : मुलीचे तोंड दाबून ठेवणे, तिच्यासह स्वत:ला निर्वस्र करणे आणि कोणत्याही झटापटीशिवाय बलात्कार करणे या गोष्टी एकट्या पुरुषाकरिता ...

नागपूर : मुलीचे तोंड दाबून ठेवणे, तिच्यासह स्वत:ला निर्वस्र करणे आणि कोणत्याही झटापटीशिवाय बलात्कार करणे या गोष्टी एकट्या पुरुषाकरिता अशक्य आहेत, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून संबंधित आरोपीला ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले.

सूरज चंदू कासरकर (२६) असे आरोपीचे नाव असून, तो यवतमाळ येथील रहिवासी आहे. २६ जुलै २०१३ रोजी रात्री ९.३०च्या सुमारास तक्रारकर्ती मुलगी घरामध्ये खाटेवर लेटून होती. तिचा लहान भाऊ खाली झोपला होता व आई घराबाहेर गेली होती. दरम्यान, आरोपीने दारूच्या नशेत घरात प्रवेश केला व मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबून ठेवले आणि त्यानंतर मुलीसह स्वत:चे कपडे काढून बलात्कार केला, अशी पोलीस तक्रार होती. उच्च न्यायालयाने ही तक्रार अविश्वासार्ह ठरवली. या सर्व गोष्टी करणे एकट्या पुरुषाकरिता अशक्य आहेत. हा बलात्कार असता तर मुलगी व आरोपीमध्ये झटापट झाली असती. परंतु, वैद्यकीय अहवालानुसार मुलीच्या शरीरावर काहीच जखमा नव्हत्या. मुलीची शरीरसंबंधास सहमती होती हा आरोपीचा बचाव आहे. शिवाय, घटनेच्या वेळी आई आली नसती तर तक्रार नोंदवली नसती असे मुलीने मान्य केले आहे, असे उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले. आरोपीला एकमेव मुलीच्या बयानावरूनही दोषी ठरवले जाऊ शकते; पण बयान व पुरावे विश्वासार्ह असणे आवश्यक आहे, असेदेखील न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.

------------

सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द

१४ मार्च २०१९ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७६(१) अंतर्गत दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला व आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.