शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गायन, संतूरवादनाने बहरलेली सायंकाळ

By admin | Updated: February 13, 2015 02:15 IST

पं. सतीश व्यास यांचे सुरेल आणि ताकदीचे संतूरवादन आणि युवा गायक राहुल देशपांडे यांच्या तडफदार तानांच्या बरसातीने बहरलेले गायन आज रसिकांना आनंद देणारे ठरले.

नागपूर : पं. सतीश व्यास यांचे सुरेल आणि ताकदीचे संतूरवादन आणि युवा गायक राहुल देशपांडे यांच्या तडफदार तानांच्या बरसातीने बहरलेले गायन आज रसिकांना आनंद देणारे ठरले. ज्येष्ठ संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी फारशा प्रचलित नसलेल्या रागाच्या वादनाने रसिकांना आनंद दिला तर राहुल देशपांडे यांनी ख्याल, बंदिश, दादरा आणि अभंग सादर करून रसिकांची दाद घेतली. या दमदार सादरीकरणाने आज पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सवाला थाटात प्रारंभ करण्यात आला. रसिकांची दाद घेत आजचे हे सादरीकरण नागपूरकरांची सायंकाळ सुरेल करणारे ठरले. सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने या पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सवाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे. या महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. आजच्या मैफिलीचा प्रारंभ नागपूरचेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. राहुल देशपांडे यांच्या उपशास्त्रीय आणि सुगम गायनाचे काही कार्यक्रम नागपुरात झाले पण त्यांचे शास्त्रीय गायन ऐकण्याचा योग नागपूरकरांना आला नव्हता. या महोत्सवात त्यांच्या शास्त्रीय गायन ऐकण्याचा आनंद घेता आला. पं. वसंतराव देशपांडे यांच्या नावाने असणाऱ्या सभागृहात त्यांच्या नातवाचे शास्त्रीय गायन ऐकणे हा औचित्यपूर्ण योग होता. त्यांनी आपल्या गायनाचा प्रारंभ सर्वांगसुंदर पुरिया धनश्री रागाने केला. पुरिया धनश्री म्हणजे सायंकालीन राग. आर्तता, विरहाची भावना मांडतानाच एक अनामिक हुरहूर निर्माण करणाऱ्या या रागाची सौंदर्यस्थळे नेमकेपणाने आपल्या गायनातून सादर करीत राहुल यांनी जाणकार रसिकांना आज जिंकले. रागाची मांडणी आणि विस्तार करताना त्यांनी घेतलेल्या अनेक हरकती आनंद देणाऱ्या होत्या. यानंतर त्यांनी ‘पायलिया झनकार...’ ही चीज तबीयतीने सादर करून रसिकांची दाद घेतली तर केदारनंद रागातील पं. कुमार गंधर्व यांची बंदिश ‘ला दे मेरा म्हाने चुनरी’ ही बंदिश सादर करून त्यांनी उंची गाठली. राहुल यांनी सादर केलेली ‘सावरे ए जय्यो...’ ही चीज तर खास वसंतरावांची आठवण ताजी करणारी होती. यानंतर त्यांनी ‘गुरुजी मै तो एक निरंजन’ या निर्गुणी भजनाच्या सादरीकरणाने वातावरण भारले. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी साथसंगत केली. तानपुऱ्यावर अर्चना सायगावकर आणि कल्पना खर्डेनवीस यांनी साथ दिली. यानंतर पं. सतीश व्यास यांच्या संतूरवादनाने मैफिलीचा ताबा घेतला. पं. सतीश व्यास म्हणजे वादनातले सौंदर्य आणि स्वरांच्या बारीक नक्षीकामाचा आनंद देणारे वादक. संतूरवादनावर असलेले त्यांचे प्रभुत्व वादातीतच आहे. त्यामुळेच त्यांचे वादन ऐकण्यासाठी रसिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण होते. पंडितजी काय वाजविणार याबाबत उत्सुकता होतीच. त्यात त्यांनी फारसा प्रचलित नसलेला कौशिकध्वनी रागात सादरीकरण केले. प्रथम आलाप सादर करतानाच त्यांनी रसिकांना जिंकले. रागसंगीताची अनुभूती दैवी असते याचा प्रत्यय त्यांच्या वादनातून आला. अनेक लाजवाब हरकतींनी आणि रागाच्या काही जागांवर त्यांनी केलेले स्वरांचे नक्षीकाम रसिकांना दाद द्यायला भाग पाडणारे होते. त्यांनी त्रितालात विलंबित, मध्य आणि द्रुतलयीत सादरीकरण करून हा राग हळुवार उकलत नेला. त्यांना तबल्यावर उस्ताद अल्लारखाँ साहेबांचे शिष्य पं. आदित्य कल्याणपूर यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी)