शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशपत्राचा तिढा कायम

By admin | Updated: November 15, 2015 02:10 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ प्रशासनासाठी परीक्षा विभागाचे संगणकीकरण डोकेदुखी ठरत आहे.

महाविद्यालयांचे असहकार्य : २६ पासून हिवाळी परीक्षांचे चौथे सत्र सुरू नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ प्रशासनासाठी परीक्षा विभागाचे संगणकीकरण डोकेदुखी ठरत आहे. यात आॅनलाईन रजिस्ट्रेशनपासून तर आॅनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यापर्यंत अनेक कसरती कराव्या लागत आहेत. शिवाय आता आॅनलाईन प्रवेशपत्राची नवीन समस्या निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, यापूर्वीही अशीच समस्या निर्माण झाली होती. गत ३० आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या सत्रात आलेल्या समस्येनंतर विद्यापीठ प्रशासनाने भविष्यात अशी अडचण निर्माण होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यात कोणतही सुधारणा झाली नसून, आजही ‘जैसे थे’ स्थिती आहे. नुकत्याच ७ नोव्हेंबरपासून इंजिनिअरिंगची परीक्षा सुरू झाली असून, या परीक्षेचे प्रवेशपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या चौथ्या सत्रातील परीक्षांदरम्यान तीच समस्या निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. माहिती सूत्रानुसार, अजूनपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेशपत्र तयार झालेले नाही. त्यामुळे परीक्षा विभागाने हस्तलिखित प्रवेशपत्र तयार करणे सुरू केले आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या मते, आॅनलाईन प्रक्रियेसाठी महाविद्यालयांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. अनेक महाविद्यालयांनी अजूनपर्यंत विद्यार्थ्यांचा आॅनलाईन डाटा उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेशपत्र तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. (प्रतिनिधी)