शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसूर्या प्रकरण, करडे विशेष सरकारी वकील

By admin | Updated: May 29, 2015 02:28 IST

श्रीसूर्या समूहाने केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा एमपीआयडी विशेष न्यायालयात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी अ‍ॅड. बी. एम. करडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

नागपूर : श्रीसूर्या समूहाने केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा एमपीआयडी विशेष न्यायालयात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी अ‍ॅड. बी. एम. करडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शेकडो पीडित गुंतवणूकदारांनी शासनाकडे ही मागणी केली होती. करडे यांच्या नियुक्तीमुळे पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची आशा बळावली आहे. समीर सुधीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी समीर जोशी हे या महाघोटाळ्याचे म्होरके आहेत. त्यांनी मुदत ठेवींवर त्रैमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून २००५ ते १४ सप्टेंबर २०१३ या काळात ५०९२ गुंतवणूकदारांची २३९ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी आणि पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल केले होते. आर्थिक गुन्हे पथकाकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विष्णूपंत भोये यांनी तपास करून १३ डिसेंबर २०१३ रोजी या दोन्ही आरोपींविरुद्ध ३०२० पानी आरोपपत्र दाखल केलेले आहे. यात ६९९ जणांना साक्षीदार करण्यात आले आहे. या प्रकरणात एजंटांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. सध्या समीर जोशी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून पल्लवी जामिनावर आहे.(प्रतिनिधी)