शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळा परिसरातील दुकानदारांना अभय

By admin | Updated: July 22, 2014 00:54 IST

पुढील आदेशापर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या हमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फुटाळा तलाव परिसरातील १० खाद्यान्न दुकानदारांना नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रस्तावित कारवाईपासून

हायकोर्ट : दुकाने बंद ठेवण्याची हमी मागितलीनागपूर : पुढील आदेशापर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या हमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फुटाळा तलाव परिसरातील १० खाद्यान्न दुकानदारांना नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रस्तावित कारवाईपासून अभय प्रदान केले आहे. दुकानदारांना २३ जुलैपर्यंत हमीपत्र सादर करायचे आहे.नासुप्रकडून केव्हाही दुकाने हटविण्याची कारवाई केली जाण्याची शक्यता पाहता राहुल नागुलवार व इतर नऊ खाद्यान्न दुकानदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी आज, सोमवारी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. १७ फेब्रुवारी २०१० रोजी नासुप्र व सेल्स अ‍ॅडस्दरम्यान झालेल्या कराराचे उल्लंघन करून फुटाळा तलाव परिसरात बांधण्यात आलेल्या अनधिकृत खाद्यान्न दुकानांना हटविण्यासाठी समाजसेवक संजय अग्रवाल यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने आता दोन्ही याचिकांवर २५ जुलै रोजी एकत्र सुनावणी निश्चित केली आहे.गेल्या तारखेला न्यायालयाने फुटाळा तलाव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कोणती कारवाई प्रस्तावित आहे, नासुप्र हे प्रकरण कसे हाताळत आहे, अनधिकृत बांधकामासाठी कोणते अधिकारी जबाबदार आहेत व कोणती शासकीय संस्था त्यांच्याकडून भाडे मिळवीत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे २५ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश नासुप्रला दिले आहेत. नासुप्रने सेल्स अ‍ॅडस्ला फुटाळा तलाव परिसरात खाद्यान्नाचे २० काऊंटर सुरू करण्यासाठी चार ठिकाणी जागा निश्चित करून दिली आहे. सेल्स अ‍ॅडस्ने २० दुकानदारांची यादी सादर करून, अन्य व्यक्तींशी त्यांचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नासुप्रने ८५ अनधिकृत दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली आहे.कंत्राटदार एजन्सीने कराराचे उल्लंघन करून संपूर्ण तलाव परिसरात अवैध काऊंटर बांधून ते भाड्याने दिले आहेत. पार्किंग व बसण्याच्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अनधिकृत होर्डिंग्ज व लहान मुलांना खेळण्याची साहित्ये लावण्यात आली आहेत. कंत्राटदाराद्वारे तलावाची नियमित साफसफाई करण्यात येत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी घाण साचली आहे. यासंदर्भात नासुप्रकडे तक्रार केली, पण त्यांनी कंत्राटदारावर कारवाई केली नाही. दिखावा म्हणून केवळ नोटीस देण्यात आली. कंत्राटदार कंपनी कराराचे उल्लंघन करून शासकीय महसुलाची लूट करीत असल्याचा अग्रवाल यांचा आरोप आहे.(प्रतिनिधी)