शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

Raghuji Bhosale: धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला

By योगेश पांडे | Updated: April 28, 2025 11:13 IST

Raghuji Bhosale Sward Auction: न्यूयॉर्कची ब्रोकर कंपनी लिलाव करणार, कंपनीपर्यंत तलवार गेलीच कशी?

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपुरातील भोसले घराण्याची संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार (Sword) चक्क एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला काढण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या एका ब्रोकर कंपनीकडून हा लिलाव करण्यात येत आहे. संबंधित तलवार ही नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (Raghuji Maharaj Bhosale) (प्रथम) यांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधित तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली याचा शोध भोसले घराण्याकडून घेण्यात येत आहे.

‘सोथबाय’ या कंपनीकडून ऑनलाईन ब्रोकर कंपनीकडून ही तलवार विक्रीला ठेवण्यात आली आहे. संंबंधित कंपनी ब्रिटीशांकडून स्थापित मल्टिनॅशनल कंपनी असली तरी याचे मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. कंपनीने सात हजार ग्रेट ब्रिटन पाऊंडपासून(७.९५ लाख रुपये) लिलाव सुरू करण्यात येणार आहे. या लिलावासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भोसले घराण्यालादेखील धक्का बसला आहे. ही तलवार आमच्याकडे परत यावी यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असल्याची माहिती राजे मुधोजी भोसले यांनी दिली.

ब्रिटीशांनी लुटली की अधिकाऱ्यांनी चोरली?

संबंधित तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली हे मोठे कोडेच आहे. १८५३ ते १८६४ या कालावधीत महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) उर्फ (आप्पासाहेब महाराज) यांच्या नेतृत्वात मराठा विरुद्ध ब्रिटिश युध्द झाले होते. त्याच कालावधीत इंग्रजांनी ब्रिटीशांनी नागपूरकर भोसल्यांचा खजिना लुटला होता. त्यात अनेक रत्नजड़ित दागदागिने, शस्त्रसाठा व तलवारींची लूट करण्यात आली होती. त्या लुटीत कदाचित ही तलवार गेली असावी अशी शक्यता आहे. याशिवाय एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही तलवार लपुन नेली आसावी व कालांतराने तिची विक्री केली असावी अथवा कुणाला भेट दिली असावी. ही तलवार ऐतिहासिक शस्त्रांचे जतन करून त्यांची विक्री करणाऱ्या कंपनीकडे कशी आली हा मोठा प्रश्न आहे.

अशी आहे 'ती' तलवार

संबंधित तलवार ही युरोपियन शैलीतील आहे. त्यावर देवनागरी लिपीने अंकित करण्यात आले असून सोन्याने जडविलेली मूठ आहे. तसेच त्यात हिरव्या विणलेल्या लोकरीची पकडदेखील आहे. या तलवारीत एकेरी ब्लेड आहे. ही तलवार १२४ सेमी लांबीची आहे.

टॅग्स :nagpurनागपूरhistoryइतिहास