शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; नागपुरात मृतदेहांची अदलाबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:11 IST

‘कोविड’ विषाणूची चाचणी करण्यासाठी आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. चुकीच्या मृतदेहाची ओळख पटविल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागला.

ठळक मुद्देदफन केलेला मृतदेह काढावा लागला बाहेरचुकीच्या मृतदेहाची ओळख पटविल्याने उडाला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपर : ‘कोविड’ विषाणूची चाचणी करण्यासाठी आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. चुकीच्या मृतदेहाची ओळख पटविल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागला. रात्री उशीरा दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सक्करदरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणारा झुबेदा आश्रम येथील एका वृद्ध महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाल्याने कोविड चाचणी करण्याचा नियम आहे. त्यानुसार मृतदेह मेडिकलमध्ये आणण्यात आला. डॉक्टरांनी मृतदेहाचा नमुना घेऊन चाचणीसाठी पाठविला. तर अहवाल येईपर्यंत मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला. याच दिवशी जयभीमनगर येथील ७० वर्षीय महिलेचा घरीच मृत्यू झाला. कंटन्मेंट भागातील महिला असल्याने नमुना तपासणीसाठी मृतदेह मेडिकलमध्ये आणण्यात आला. या मृतदेहाचेही नमुना घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले, तर मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला. गुरुवारी सकाळी झुबेदा आश्रम येथील वृद्ध महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे मेडिकलच्या शवगृहातून सक्करदर पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलीस आश्रमचा एका कर्मचाऱ्याला घेऊन आले. कर्मचाºयाने मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी पंचनामा करून कर्मचाºयाकडे मृतदेह सोपविला. अनोळखी वृद्धा असल्याने मोक्षधाम घाटावर दफनविधी करण्यात आला. सायंकाळी जयभीमनगर येथील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. याची माहिती मेडिकलच्या बुथला देण्यात आली. त्यांनी मृतदेहाच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. परंतु शवागृहात जो मृतदेह होता तो आपला नसल्याचे नातेवार्इंकांनी सांगताच गोंधळ उडाला. त्यांनी तातडीने मोक्षधाम गाठले. अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाली होती. पुन्हा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनी ओळख पटवली. पोलिसांनी पुन्हा पंचनामा करीत मृतदेह सोपविला. सक्करदरा पोलिसांनी पुन्हा मेडिकल गाठून झुबेदा आश्रममधील वृद्ध महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. आश्रमच्या कर्मचाऱ्याकडे तो सापविला. रात्री उशीरा दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपुरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे.-चुकीच्या मृतदेहाची ओळख पटवली चुकीचा मृतदेहाची ओळख पटविल्याने हा गोंधळ उडाला. यात मेडिकलकडून कुठलिही चूक झालेली ही. मेडकलने दोन्ही मृतदेहाचे नमुना घेऊन ते तपासून तसा अहवाल दिला.

डॉ. अविनाश गावंडे

वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल

 

टॅग्स :Deathमृत्यू