शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! डॉक्टर वडीलांच्या मृत्यूनंतर भाऊ-बहीण चालवत होते बोगस दवाखाना

By योगेश पांडे | Updated: February 27, 2025 22:25 IST

Nagpur News: डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ व बहीण कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसताना दवाखाना चालवत होते व रुग्णांच्या जीवाशी एकाप्रकारे खेळच करत होते. मागील दीड महिन्यांपासून मोमीनपुरा येथील अन्सारनगर येथे हा प्रकार सुरू होता.

- योगेश पांडे नागपूर  - डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ व बहीण कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसताना दवाखाना चालवत होते व रुग्णांच्या जीवाशी एकाप्रकारे खेळच करत होते. मागील दीड महिन्यांपासून मोमीनपुरा येथील अन्सारनगर येथे हा प्रकार सुरू होता. महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या पत्रानंतर नागपूर महानगरपालिकेला जाग आली व त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

जैद साजिद अन्सारी (२३, तकीया दिवाणशहा, मोमीनपुरा) व समन साजिद अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत. ते दोघेही कुठल्याही वैद्यकीय शिक्षणाशिवाय दवाखाना चालवत असल्याची तक्रार महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या मुंबई कार्यालयात झाली होती. तेथून पत्र आल्यानंतर नागपूर मनपाच्या गांधीबाग झोनचे वैद्यकीय अधिकारी विजयकुमार तिवारी हे मंगळवारी तहसील पोलीस ठाण्यातील पथकासह अन्सारनगर येथील सय्यद क्लिनिक येथे पोहोचले. तेथे जैद अन्सारी बसला होता. तिवारी यांनी त्याला वैद्यकीय शिक्षणाच्या प्रमाणपत्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्याने कुठलेही शिक्षण झाले नसल्याची कबुली दिली. त्याचे वडील डॉ.साजिद इक्बाल अन्सारी हे क्लिनिक चालवायचे. त्यांचा दीड वर्षांअगोदर मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर जैद व त्याची बहीण समन यांनी दवाखाना चालवायला घेतला. डिसेंबर २०२३ पासून दोन शिफ्टमध्ये ते रुग्णांवर उपचार करत होते. त्यांनी शेकडो रुग्णांचा जीव या माध्यमातून धोक्यात घातला. तिवारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दवाखान्यात औषधे व वैद्यकीय साहित्यसंबंधित क्लिनिकमध्ये आरोपींनी स्टेथोस्कोप, बीपी मशीन यांच्यासह वैद्यकीय साहित्य ठेवले होते. याशिवाय तेथे इंजेक्शन, औषधे, सलाईन देखील ठेवले होते.

टॅग्स :docterडॉक्टरnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी