शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ बनली ‘सावित्री’...

By admin | Updated: June 2, 2015 02:02 IST

म्हणतात की, सावित्रीने साक्षात यमाला नमवत आपल्या पतीचे प्राण वाचविले. ही दंतकथा पिढ्यान्पिढ्यापासून सांगितली,

नरेश डोंगरे ल्ल नागपूरम्हणतात की, सावित्रीने साक्षात यमाला नमवत आपल्या पतीचे प्राण वाचविले. ही दंतकथा पिढ्यान्पिढ्यापासून सांगितली, ऐकवली जाते. नागपुरातील एका महिलेने प्रसंगावधान आणि धाडसाचा अतुलनीय परिचय देत मृत्यूने विळखा घातलेल्या आपल्या पतीची सोडवणूक केली. होय, मृत्यूच्या जबड्यातून त्यांना परत आणले. वर्तमानातील सावित्री बनलेल्या या महिलेचे नाव आहे, वंदना पुरुषोत्तम पौनीकर. वय वर्षे ४२. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटील लेआऊटमध्ये (भामटी) त्यांचे निवासस्थान आहे.विपुल (वय १९) आणि प्रणिता (वय १८) ही मुले तसेच इंडियन ओव्हरसिज बँक, मुंबईत नोकरीला असलेले पती. सारे काही आलबेल असताना त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली. अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विपुलचा १९ आॅगस्ट २०१४ ला संशयास्पद मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचा देखावा होता. मात्र, तो आत्महत्या करण्यासारखे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे पौनीकर परिवारावर जोरदार मानसिक आघात झाला. ज्या घरात साऱ्या सुखसोयी आहेत, त्या घरात विपुलचा मृत्यू झाल्यामुळे पौनीकर कुटुंबीयांना त्या घरात राहाण्याची इच्छाच संपली. त्यामुळे त्यांनी ते घर विक्रीला काढले. याला त्याला सांगून घराच्या विक्रीची तयारी झाली. विकत घेणारे, खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे एजंट येऊ लागले. सोमवारी १८ मे ला रखरखत्या उन्हात दुपारी २.२० वाजता एक तरुण त्यांच्याकडे आला. स्वत:चे नाव लकी सांगणाऱ्या या आरोपीने ‘आपण घर खरेदी विक्रीचे ब्रोकर म्हणून काम करतो‘, असे सांगून एक ग्राहक घर बघायला येत आहे, असेही सांगितले. बराच वेळ टाईमपास केल्यानंतर त्याने पौनीकर यांना घर दाखवण्यास सांगितले. त्यानुसार, पौनीकरांनी त्याला खालचा माळा आणि नंतर पहिला माळा दाखवायला नेले. वरच्या माळ्यावर जाताच काय झाले कळायला मार्ग नाही. पौनीकर जोरजोरात ओरडू लागले. ते ऐकून वंदना पौनीकर पहिल्या माळ्याकडे धावल्या. यावेळी वरून लकी धावत येत होता. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. त्याने वंदना यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सौभाग्याचे लेणे हिसकावले गेल्याचे पाहून वंदना यांनी त्याची मानगुट पकडली. मात्र, चाकू शरीरात असलेले पौनीकर ओरडले. धनीच धोक्यात असल्याचे पाहून त्यांनी सौभाग्याच्या लेण्याकडे दुर्लक्ष केले. आरोपीला सोडून त्या पतीकडे धावल्या. पुरुषोत्तम यांच्या छातीत चाकू रुतून होता. रक्त भळभळा वाहत होते. आरडाओरड करूनही लगेच कुणी मदतीला धावले नसल्यामुळे वंदना यांनी स्कुटी काढली. गूड न्यूजमुलाचे अकाली जाणे आणि त्यानंतर आठच महिन्यात पती मृत्यूच्या जबड्यात पोहचल्याचे दु:ख कोणत्याही महिलेला हादरवणारेच! हे दोन हादरे सहन करणाऱ्या वंदना यांना पती सुखरूप घरी परतल्याचे समाधान आहेच. याचवेळी मुलगी प्रणिता हिने ८६ टक्के गुण प्राप्त करून गुणवत्तायादीत स्थान मिळवले. प्रणिताची ही ‘मेरिट‘भेट तिच्या आईवडीलांचे दु:ख निश्चितच हलके करणारी ठरली.