शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळ चौकशी समिती अवैध

By admin | Updated: June 29, 2014 00:50 IST

काँग्रेसनगरस्थित शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिकांच्या लैंगिक छळाची चौकशी करण्यासाठी स्थापित अंतर्गत तक्रारी समिती व समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्ट : शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्रकरणनागपूर : काँग्रेसनगरस्थित शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिकांच्या लैंगिक छळाची चौकशी करण्यासाठी स्थापित अंतर्गत तक्रारी समिती व समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध व कायदाबाह्य ठरविला आहे. कायद्यानुसार नवीन समिती स्थापन करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. डॉ. जया कोडाते, डॉ. वंदना मेश्राम व डॉ. कल्पना पवार अशी पीडित प्राध्यापिकांची नावे असून, तिघींनीही वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या आहेत. कोडाते भूगर्भशास्त्र, मेश्राम शारीरिक शिक्षण, तर पवार या गणिताच्या सहायक प्राध्यापिका आहेत. २५ जून २०१३ रोजी जारी बदलीचा आदेश रद्द करण्यात यावा, लैंगिक छळ केल्याप्रकरणी भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. सी. शाह यांची विभागीय चौकशी करण्यात यावी व कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ कायद्याच्या कलम ४ अनुसार अंतर्गत तक्रारी समिती स्थापन करण्यात यावी, अशी त्यांची विनंती होती.१८ डिसेंबर २०१३ रोजीच्या न्यायालयीन आदेशान्वये शिवाजी शिक्षण संस्थेने समिती स्थापन केली होती. समितीने प्रकरणाची चौकशी करून दोन वेगवेगळे अहवाल सादर केले होते. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी समिती व समितीच्या अहवालावर आक्षेप नोंदविला. समिती अनधिकृत व घटनाबाह्य असून समितीच्या सदस्यांनी सादर केलेल्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही. श्रीमती प्रा. ब्राह्मणकर व घाटोळे यांची समितीच्या सदस्यपदी नियुक्ती अवैध आहे. ब्राह्मणकर शिक्षण सेवक असून त्यांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालेला नाही, तर घाटोळे यांच्याविरुद्ध फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.यासह विविध बाबी लक्षात घेता न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी १० दिवसांत योग्य अंतर्गत तक्रारी समिती स्थापन करण्यात यावी व समितीने तिच्या स्थापनेपासून ३० दिवसांत प्रकरणाची चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. समितीचा अहवाल आल्यानंतर प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. याचिकांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक, शिवाजी शिक्षण संस्था, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. देवेंद्र बुरघाटे, डॉ. के. सी. शाह व डॉ. प्रतिभा बुरघाटे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.न्यायालयाचा निष्कर्षकायद्यानुसार समितीतील सदस्यांना समाजसेवेचा अनुभव व कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ब्राह्मणकर व घाटोळे कायद्यातील निकष पूर्ण करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही. समितीची स्थापना अवैध व कायदाबाह्य आहे. समितीच्या अहवालावर विश्वास ठेवू शकत नाही. (प्रतिनिधी)