शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित तक्रारींचा निपटारा करा

By admin | Updated: April 4, 2017 02:04 IST

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जनतेकडून दाखल होणाऱ्या तक्रारींसंदर्भात एक महिन्यात निर्णय घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारांना कळविणे बंधनकारक आहे.

लोकशाहीदिनात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे आवाहननागपूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जनतेकडून दाखल होणाऱ्या तक्रारींसंदर्भात एक महिन्यात निर्णय घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारांना कळविणे बंधनकारक आहे. विविध विभागप्रमुखांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल अवगत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी दिल्या.जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन छत्रपती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी आपली गाऱ्हाणी व तक्रारी लोकशाही दिनात मांडली. निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी तक्रारी सोपविल्या. या लोकशाही दिनात २० तक्रारी दाखल झाल्या आहेत. भूमिअभिलेख, महसूल तसेच सहकारी विभागासंदर्भात सर्वाधिक तक्रारी आजच्या लोकशाही दिनात दाखल झाल्या. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)विविध विभागात १८४ तक्रारी प्रलंबितविविध विभागांमध्ये १८४ तक्रारी प्रलंबित आहेत. यापैकी सार्वाधिक तक्रारी भूमिअभिलेख तसेच महसूल, शिक्षण, नगर प्रशासन, सहकार, नागपूर पाटबंधारे विभाग आदी विभागांशी संबंधित आहेत. या तक्रारीं संदर्भात चौकशी करून संबंधित तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल लेखी स्वरूपात कळविण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.विभागीय लोकशाहीदिन १० एप्रिल रोजी विभागीय लोकशाहीदिन येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार हे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकतील. तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या टोकनाची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच घेऊन सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वत: उपस्थित राहावे.