शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
4
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
5
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
6
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
7
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
8
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
9
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
10
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
11
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
12
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
13
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
14
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
15
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
16
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
17
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
19
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
20
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती : जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 20:29 IST

सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्दे‘फेसबुक लाईव्ह’ : साधला नागरिकांशी संवाद, प्रश्नांची उत्तरेही दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे आणि देशाचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढणार काय, २० एप्रिलनंतर दुकाने सुरू होतील काय, ग्रामीण भागात असलेल्या एमआयडीसी मधील उद्योग सुरू होतील का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, लॉकडाऊनची मर्यादा कमी करणे अथवा वाढविणे हे नागरिकांच्या हातात आहे. लॉकडाऊनचे पालन झाले तर कोरोनाची साखळी तुटेल आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल.बाहेरगावी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या शहरात जाता येईल का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्वत:ला आहे त्या ठिकाणीच ठेवणे, हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे आहे तेथेच राहा. तेथे काही अडचणी येत असेल तर स्थानिक प्रशासन नक्कीच मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला.नागपूर शहरात ज्या-ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्या भागातील सुमारे तीन किलोमीटर परिघाचा परिसर सील करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजानजी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, रवि गीते, मेट्रोचे अखिलेश हळवे, आनंद नगरकर, आनंद अंबेकर, बरखा गोयनका आदी उपस्थित होते.लॉकडाऊनची मर्यादा ठरविणे नागरिकांच्या हाती 

२० एप्रिल रोजीच्या परिस्थितीनुसार निर्णयजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या आजच नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसार १९ एप्रिलपर्यंत परिस्थितीचे अवलोकन केले जाईल. परिस्थिती आटोक्यात असली तर काही गोष्टींमध्ये शिथिलता देता येईल. त्यामुळे याबाबतचा निर्णय हा २० एप्रिल रोजी असलेल्या परिस्थितीवर आधारित राहील.दररोज ६५ ते ७० हजार लोकांना मदतलॉकडाऊनदरम्यान निराधार ज्येष्ठ नागरिक, गरजू व्यक्ती, दिव्यांगांना त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन समाजसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत भोजन, दैनंदिन आवश्यकतेचे सामान पोहचवीत आहेत. दररोज सुमारे ६५ ते ७० हजार लोकांपर्यंत मदत पोहचविली जात आहे. रस्त्यावर भटकंती करणारे, बेघर लोकांनासुद्धा मनपाने उभारलेल्या बेघर निवाऱ्यात ठेवण्यात आले असून, तेथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे आणि त्यांनी चहा, नाश्ता, भोजन पुरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरFacebookफेसबुक