शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

सत्र न्यायालय : विजय डांगरेला जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 9:28 PM

मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना फसवणे व त्यांना धमकी देण्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बिल्डर विजय तुळशीराम डांगरेने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला.

ठळक मुद्देमालमत्ता खरेदी करणाऱ्यांची फसवणूक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना फसवणे व त्यांना धमकी देण्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बिल्डर विजय तुळशीराम डांगरेने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.हिरा दलाल, प्रदीप खोडे, राजीव मेंघरे व रमेश पिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी डांगरेविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ५०४, ५०६-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. डांगरेने २००६ मध्ये मौजा चिखली खुर्द येथील जमिनीवर (ख.क्र. २७/१, प.ह.क्र. ३९) स्वराज पार्क नावाच्या गृह प्रकल्पाची घोषणा केली होती. तक्रारकर्त्यांनी योजनेतील बंगले खरेदी करून डांगरेला एकूण २ कोटी ४ लाख २५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर प्रकल्पातील बंगल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. तसेच, तक्रारकर्त्यांना त्यांची रक्कमही परत करण्यात आली नाही. तक्रारकर्ते रक्कम मागण्यासाठी गेले असता डांगरेने त्यांना शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. याशिवाय डांगरेने ६ मार्च २०२० रोजी संबंधित जमीन तेथील बांधकामांसह मुकुंद देशमुख यांना विकली असा आरोप आहे. न्यायालयात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयfraudधोकेबाजी