शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिच्या’साठी तयार झाला सेवेचा सेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST

कन्हान : लॉकडाऊनमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. रोजगार बुडाले. रोजगारासाठी सर्वत्र भटकंती सुरू आहे. अशात कुणाच्या घरी एखादा सदस्य ...

कन्हान : लॉकडाऊनमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. रोजगार बुडाले. रोजगारासाठी सर्वत्र भटकंती सुरू आहे. अशात कुणाच्या घरी एखादा सदस्य गंभीर आजारी झाल्यास संर्पूण कुटुंब चिंतेने व्याकुळ होते. मात्र, गरजवंतांना मदत करणारे काही लोक आजही समाजात असल्याने गरिबांच्या जगण्याच्या आशा बळावल्या आहेत. असाच एक प्रसंग पारशिवनी तालुक्यात घडला आहे. एका १६ वर्षीय मुलीला जीवदान देण्यासाठी टेकाडी-कन्हान-कामठी अशी एक मानवतेची साखळी निर्माण झाली. या मुलीवर शस्त्रक्रिया होऊन ती सध्या सुखरूप आहे.

पारशिवनी तालुक्यात खदान क्रमांक ३ येथे ठाकूर दाम्पत्य राहते. त्यांची १६ वर्षीय मुलगी पूनम अपेंडिक्सच्या आजाराने गत वर्षभरापासून त्रस्त होती. उपचार म्हटलं की, मोठ्या रकमेचे आकडे डोळ्यादेखत फिरू लागतात. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुलीच्या ऑपरेशनचा खर्च झेपणार नसल्याने ठाकूर दाम्पत्याने मदतीचा हात समाजापुढे केला. ते टेकाडी येथील सरपंच सुनीता मेश्राम यांच्याकडेही गेले. पालकांनी मुलीच्या आजाराची माहिती मेश्राम यांना दिली. मेश्राम यांनी लगेच दखल घेत कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. योगेश चौधरी यांना याबाबत माहिती दिली. डॉ. चौधरी यांनी मुलीची तपासणी केली असता त्वरित शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे पालकांना सांगितले. त्यांनी विलंब न करता मुलीला कामठी येथील आशा हॉस्पिटल येथे नेले. याचदरम्यान पूनमच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे तिच्या पालकाकडे नसल्याची माहिती कामठी येथील समाजसेवक रंजित चंद्रवंशी यांनी मिळाली. त्यांनी शासकीय योजनेंतर्गत उपचार होण्यासाठी कागदोपत्री पूर्तता पूनमच्या पालकांना करून दिली. आशा हॉस्पिटलचे डॉ. सौरभ अग्रवाल यांनी पूनमवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करत आजारातून मुक्त केले. पूनमच्या पालकांच्या या लढ्यात आशा हॉस्पिटलचे व्यवस्थापक राम येरपुडे, डॉ. वर्मा, रविना मेश्राम, कल्याणी पुणेकर, सरपंच सुनीता मेश्राम, टिंकू सिंग, राहुल उके, अरविंद ओझा, त्रिभुवन सिंग यांनी सहकार्य केले.