शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

झिका, निपाहसारख्या गंभीर आजारांचे आता नागपुरातच होणार तातडीने निदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:09 IST

एम्समध्ये उभारणार 'बीएसएल-३' लॅब : 'एनसीडीसी'सोबत सामंजस्य करार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भारताच्या सार्वजनिक आरोग्य संरचनेत क्रांती घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) अत्याधुनिक बायो-सेफ्टी लेव्हल-३ (बीएसएल) प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), नवी दिल्लीसोबत सामंजस्य करार केला. यामुळे बर्ड फ्लू, झिका, निपाह, जपानी एन्सेफलायटिस, एमपॉक्स यांसारख्या अत्यंत गंभीर आजाराचे 'एम्स'मध्येच निदान होण्यास मदत होणार आहे.


झुनोटिक इन्फेक्शन्स' जे प्राण्यांकडून मानवांमध्ये पसरतात त्याची तातडीने तपासणी होणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे यातील आजाराच्या उद्रेकांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण मिळविणे शक्य होते. या पार्श्वभूमीवर 'एम्स'मधील 'बीएसएल-३' प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत ही प्रयोगशाळा उभारली जाईल, अशी माहिती एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. जोशी यांनी दिली. ते म्हणाले, ही प्रयोगशाळा आजाराच्या निदानासोबतच महाराष्ट्रातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक केंद्र म्हणूनही काम करेल. अत्यंत संसर्गजन्य रोगांच्या उद्रेकाच्यावेळी नागपूर, विदर्भ आणि गडचिरोली, छत्तीसगड, तेलंगणासारख्या लगतच्या प्रदेशातील लोकांसाठी ही प्रयोगशाळा अत्यंत फायदेशीर ठरेल.


सामंजस्य करारानुसार, 'एनसीडीसी', नवी दिल्लीने 'बीएसएल-३' सुविधेसाठी एकूण ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील २५ कोटाँचा निधी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि ५ कोटींचा निधी आवश्यक उपकरणे, किट आणि उपभोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी केला जाणार आहे.


महाराष्ट्रातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय
एम्स नागपूरच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि बीएसएल-३ सुविधेच्या प्रकल्प प्रभारी डॉ. मीना मिश्रा यांनी सांगितले, सध्या महाराष्ट्रात फक्त नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे येथे 'बीएसएल-३' प्रयोगशाळा आहे. एम्स नागपूरमध्ये ही प्रयोगशाळा असणारी महाराष्ट्रातील पहिली वैद्यकीय संस्था ठरणार आहे. 'बीएसएल-३' या प्रयोगशाळेत विशेष प्रशिक्षित कर्मचारी संरक्षक उपकरणे वापरून काम करतात. यामुळे कोणतेही हानिकारक जीवाणू किंवा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडणार नाहीत याची खात्री केली जाते, ज्यामुळे शास्त्रज्ञ आणि नागरिक दोन्ही सुरक्षित राहतात. ३० मे २०२५ रोजी नागपूर, महाराष्ट्रात हा सामंजस्य करार 'एनसीडीसी' नवी दिल्ली व नागपूर 'एम्स' यांच्यात झाला. 'एनसीडीसी'चे अतिरिक्त संचालक डॉ. अंकुर गर्ग व एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी यावर स्वाक्षरी केली. यावेळी 'एनसीडीसी'चे सहसंचालक डॉ. अंकुर गर्ग आणि 'एपीएचओ' नागपूरच्या डॉ. आराधना भार्गव उपस्थित होत्या.

टॅग्स :nagpurनागपूरZika Virusझिका वायरसNipah Virusनिपाह विषाणू