शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

जागतिक महिला दिन विशेष निशांत वानखेडे नागपूर : आधुनिकतेच्या स्पर्धेत वेगाने धावणाऱ्या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने सजीवसृष्टीची व पर्यावरणाची ...

जागतिक महिला दिन विशेष

निशांत वानखेडे

नागपूर : आधुनिकतेच्या स्पर्धेत वेगाने धावणाऱ्या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने सजीवसृष्टीची व पर्यावरणाची घडी मात्र विस्कटली आहे. विस्कटलेले पर्यावरण सुधारण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक अहोरात्र झटत आहेत. प्रत्येक क्षेत्र काबीज करणाऱ्या महिला या संशोधनाच्या क्षेत्रातही मागे नाहीत. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झटणाऱ्या डॉ. अत्या कपले, डॉ. बी. पद्मा राव आणि डॉ. साधना रायलू या वैज्ञानिक म्हणजे जगभरातील अशा समस्त महिला संशोधिकांचे प्रातिनिधिक रूप होय. वेगवेगळ्या संशोधनांच्या माध्यमातून ही भूमी प्रदूषणमुक्त आणि राहण्यायोग्य (लिव्हेबल) ठेवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

डॉ. अत्या कपले

डॉ. अत्या कपले या नीरीमध्ये प्रदूषण नियंत्रण युनिटच्या प्रकल्प प्रमुख आणि रिसर्च सेलच्या संचालिका आहेत आणि गेल्या २५ वर्षांपासून संशोधनाच्या माध्यमातून पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी सेवा देत आहेत. डॉ. अत्या यांनी हैदराबाद येथून विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर रुरकी विद्यापीठातून बॉयोटेकमध्ये एम.एस्सी. व केंद्रीय विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर त्यांनी नीरीमध्ये जाॅइन केले. तेव्हापासून पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक प्रकल्पांचा भाग हाेत्या तर अनेक प्रकल्पांचे नेतृत्व त्यांनी केले. २०१९ मध्ये कुंभमेळ्याच्या तयारीच्या वेळी गंगा नदीसमाेरीला नाले स्वच्छतेचे आव्हान त्यांनी स्वीकारले. या प्रकल्पाचे नेतृत्व केले. जैविक अभियांत्रिकी तंत्राद्वारे त्यांनी नाला शुद्धीकरणाचे कार्य केले. त्यामुळे देशभरात हा प्रकल्प उल्लेखनीय ठरला. तेल कंपन्यांमधून हाेणारे ऑइल प्रदूषण नियंत्रणासाठी त्यांनी चालविलेले संशाेधनही माेलाचे ठरत आहे. नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठीही त्यांच्या टीमद्वारे प्रयत्न केले जात आहेत.

डाॅ. बी. पद्मा राव

नीरीमध्ये गेल्या ३० पेक्षा जास्त वर्षापासून सेवा देत असलेल्या डाॅ. बी. पद्मा श्रीनिवास राव या संस्थेच्या लिगल व पर्यावरण पाॅलिसी विभागाच्या प्रमुख आहेत. त्या मूळच्या नागपूरच्या असून एलआयटी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर दीड वर्ष मुंबई येथे एचपीसीएलमध्ये सेवा दिल्यानंतर नीरीमध्ये कार्य सुरू केले. आपल्या सेवा काळात त्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या तज्ज्ञ म्हणून २०० पेक्षा अधिक प्रकल्पांमध्ये संशाेधनाचे कार्य केले. यामध्ये एअर क्वाॅलिटी माॅनिटरिंग, वायू प्रदूषण नियंत्रण, वायू प्रदूषण व्यवस्थापन, पाेल्युशन एमिशन इनव्हेंटरी, पर्यावरणीय ऑडिट, विविध उद्याेगांचे प्रदूषण प्रभाव मूल्यांकनाचे कार्य त्यांनी केले. दिल्ली, मुंबई, काेलकाता, देहरादूनमध्ये प्रदूषणाच्या प्रभावाचा अभ्यास त्यांनी केला. ऑइल रिफायनरीद्वारे चहाच्या मळ्यावर हाेणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी उपाय सुचविला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ५० पेक्षा अधिक पेपर सादर केले. १०० हून अधिक विद्यार्थ्यांना संशाेधनासाठी मार्गदर्शन केले असून, ते विद्यार्थी आज देशविदेशात सेवा देत आहेत. सध्या पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराच्या प्रकल्पावर त्यांचे संशाेधन सुरू आहे.