शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासंदर्भात शाळांची मनमानी सुरूच

By admin | Updated: May 27, 2015 02:40 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत नागपुरात ४०५८ विद्यार्थ्यांना २९१ शाळांमध्ये प्रवेश देणे अपेक्षित होते.

नागपूर : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत नागपुरात ४०५८ विद्यार्थ्यांना २९१ शाळांमध्ये प्रवेश देणे अपेक्षित होते. मात्र, शाळांच्या मनमानीमुळे या कायद्याला हरताळ फासला जात आहे. मुख्यमंत्र्यापासून, शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत कारवाईचा इशारा दिल्यानंतरही शाळांनी त्यांच्या इशाऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहे. आजही हजारो पालकांच्या प्रवेशासंदर्भातील तक्रारी प्रलंबित असून, येत्या २९ तारखेला शिक्षण विभाग बाल हक्क समितीपुढे नेमक्या किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, याची माहिती देणार आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही प्रवेशाच्या सुरू असलेल्या घोळामध्ये हस्तक्षेप करावा, असे शिक्षण उपसंचालकांनी बाल हक्क समितीला कळविले आहे. ‘आरटीई’च्या ‘आॅनलाईन’ सोडतीमध्ये नंबर लागूनदेखील अनेक नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. कोणी ‘एन्ट्री पॉईन्ट’चे कारण दाखविले तर अनेकांनी पालकांकडून विविध नावांखाली शुल्काची मागणी केली आहे. आरटीईच्या नियमात ठरवून दिलेल्या किलोमीटरचा आधार घेत, काही शाळांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहे. अशा अनेक तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी शाळांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देशच दिले होते. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना शिक्षण उपसंचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना बाल हक्क समितीने दणका दिला होता. शाळांविरुद्ध बाल न्याय अधिनियम व ‘आरटीई’च्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. या इशाऱ्यांची काही शाळांनी अद्यापही दखल घेतली नाही. पालकांच्या तक्रारी सतत सुरू आहे. शाळांच्या आडमुठेपणाच्या धोरणाबाबत काही पालक आणि ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटीने बाल हक्क समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार समितीने आरटीईच्या अंमलबजावणीसंदर्भात विस्तृत माहिती द्यावी, असे निर्देश बालकल्याण समितीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिले होते. या नोटीसला उत्तर देताना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आरटीई अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याचे म्हटले आहे. यात त्यांनी शहरातील प्रवेशासाठी महापालिका व ग्रामीण भागातील प्रवेशासाठी जिल्हा परिषदेने हस्तक्षेप करावा असे म्हटले आहे. यासंदर्भात शासनाचा जीआरसुद्धा आहे. मात्र यासंदर्भात मनपा व जिल्हा परिषद अनभिज्ञ असल्याचे दिसते.(प्रतिनिधी)