शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत १८२६ कोटीची अनियमितता झाल्याची बाब उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:29 PM

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत १८२६.८७ कोटी रुपयाची अनियमितता झाल्याची बाब समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती देतांना सांगितले की, सरकारने १७०४ शैक्षणिक संस्थांचे आॅडिट सुरू केले आहे. अशा संस्थांकडून ९३.१६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे९३.१६ कोटी रुपये वसुलीसरकारने दिली विधानसभेत माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत १८२६.८७ कोटी रुपयाची अनियमितता झाल्याची बाब समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती देतांना सांगितले की, सरकारने १७०४ शैक्षणिक संस्थांचे आॅडिट सुरू केले आहे. अशा संस्थांकडून ९३.१६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.बडोले यांनी सांगितले की, ७० संस्थांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यातील सहायक आयुक्तांना दिले आहेत. या संस्थांमध्ये दोन आदिवासी विकास विभागाच्या अधीन आहेत. तर ६८ सामाजिक कल्याण विभागाच्या अंतर्गत आहेत. उच्च न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. परंतु वसुलीची कारवाई सुरू केली आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात बडोले यांनी सांगितले की, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणातील अनियमिततेच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठित करण्यात आली होती. १७०४ संस्थांची चौकशी केल्यानंतर १८२६.८७ कोटी रुपयाच्या शिष्यवृत्ती वितरणात अनियमितता असल्याचे आढळून आले. सरकारने ९६.१६ कोटी रुपये वसूल केले.दोषी संस्थांची यादी जाहीरसरकारने दोषी संस्थांची एक यादी सुद्धा विधानसभेत सादर केली. या संस्थांमध्ये विदर्भातील १५ शैक्षणिक संस्था आहेत. या १५ पैकी एकट्या १३ संस्था या चंद्रपुरातील आहे. उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याशी संबंधित आहेत.

टॅग्स :educationशैक्षणिकCrimeगुन्हा