शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
4
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
5
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
6
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
7
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
8
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
9
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
10
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
12
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
13
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
14
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
15
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
16
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
17
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
18
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
19
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
20
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांचा दावा, काही विरोधक व कम्युनिस्टदेखील संघ चांगला असे म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:28 IST

Nagpur : संघ केवळ कार्यकर्त्यांचा जिव्हाळा व प्रेमातून वाढत आला आहे. स्वयंसेवकांना समाजाविषयी कळकळ असते व त्यांच्या कामातून संघ समाजात पोहोचतो. दोन माणसांचे भेटणे बंद होत नाही तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
संघ केवळ कार्यकर्त्यांचा जिव्हाळा व प्रेमातून वाढत आला आहे. स्वयंसेवकांना समाजाविषयी कळकळ असते व त्यांच्या कामातून संघ समाजात पोहोचतो. दोन माणसांचे भेटणे बंद होत नाही तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही. काळासोबत संघाचे कार्य वाढले आहे. आता विरोधक व काही कम्युनिस्ट बोलताना संघाचे आम्ही विरोधक आहोत असे म्हणतात. मात्र संघ चांगला आहे असेही ते म्हणतात, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केला. नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

अनुकूलता हे एक मोठे आव्हानच असते व पतनाची सुरुवात अनुकूलतेतूनच होते. अजून संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धी अनुरूप झाला असे नाही. तो होऊ नये याचे प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत. अनुकूलतेत कसे काम करावे हा विषय बौद्धिक वर्गात असतो. स्वयंसेवकांना अनुकुलतेची बाधा होऊ नये यावर विचार सुरू असतो व तसे प्रयत्न दिसून येतात, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

रचनेचे विकेंद्रीकरण, मात्र संघाच्या कार्यपद्धतीत कुठलाही बदल नाही

शंभर वर्षांच्या कार्यकाळात संघाचे काम मोठे झाले आहे. त्यामुळे रचना विकेंद्रित होणे आवश्यक झाले. अनेकदा कामादरम्यान शासन-प्रशासनाशी संबंध येतो. त्यासाठी वेगळी व्यवस्था हवी या विचारातून प्रांताऐवजी आता विभागाची रचना तयार करण्यात आली आहे. लोकांशी मैत्री करायची व आपल्या उदाहरणातून परिवर्तन घडवायचे हीच संघाची कार्यपद्धती आहे. रूप काळानुरूप बदलत असले तरी कार्यपद्धती तीच आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

वक्तव्यांचा विपर्यास, अनेक गोष्टी शिकायला मिळतात

अनेकदा वक्तव्यांचा विपर्यास होतो. मात्र त्याचे मला फारसे काही वाटत नाही. उलट मला दया येते व हसू येते. संघाविरोधात बोलायला आता लोकांकडे फारसे काही नाही. मात्र काही तरी बोलायला हवे म्हणून असे प्रकार करतात. अशा घटनांतून आपलेदेखील शिक्षण होते. विशेष म्हणजे काय बोललल्यावर लोक काय अर्थ काढू शकतात हे समजते, असे प.पू.सरसंघचालक म्हणाले.

संघाच्या कार्याबाबत ‘जेन-झी’ अनुकूल

‘जेन-झी’ असे संबोधित करण्यात येत असलेल्या पिढीमध्ये देशाला मोठे करायचे आहे व आपली परंपरा आणखी समोर न्यायची आहे असा विचार दिसून येतो. त्यांना प्रामाणिकता व सेवेचे आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांची संघविचारांशी नाळ जुळत असून ते संघकार्याबाबत अनुकूल आहेत. प्रत्यक्ष शाखेत येण्यास परिस्थितीनुरूप काही अडचणी असल्या तरी ते संघकार्यात जुळू इच्छितात. त्या पद्धतीची व्यवस्थादेखील संघाकडून करण्यात येत आहे. हायराईज इमारती, सोसायटींमध्ये तरुणांशी संपर्क साधण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी सरसंघचालकांनी दिली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Opponents and Communists Acknowledge RSS's Goodness, Claims Sarsanghchalak Mohan Bhagwat

Web Summary : RSS grows through affection and selfless service. Even opponents acknowledge its positive aspects. Sarsanghchalak Mohan Bhagwat highlighted adapting to change while maintaining core principles. He noted increased engagement from the younger generation, 'Gen-Z', attracted by the organization's values and service-oriented approach. The organization is adapting its structure to accommodate growth and reach wider audiences.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ