शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या दूध डेअरीला संजीवनी

By admin | Updated: February 20, 2016 03:32 IST

नागपूरची बंद पडलेली शासकीय दूध डेअरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने पुन्हा सुरू होत आहे.

दूध डेअरीत होणार आधुनिक प्रयोगशाळा :पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती नागपूर : नागपूरची बंद पडलेली शासकीय दूध डेअरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने पुन्हा सुरू होत आहे. या डेअरीत आता दुधावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झालेल्या आढावा बैठकीत दूध डेअरी संस्थातील समस्यांचा आढावा घेण्यात आला. नागपूरची दूध डेअरी विविध कारणांनी बंद पडली. आता या डेअरीचे नूतनीकरण करण्यात येईल व राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ संचालित मदर डेअरी फ्रूट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल कंपनीला नाममात्र दराने भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विदर्भात दूध उत्पादन वाढावे. तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध व्हावा आणि पाळीव पशुधनाला अधिक भाव मिळून शेतकऱ्यांच्या दुधालाही भाव मिळावा या उद्देशाने या डेअरीला नवसंजीवनी देण्यात येणार आहे. शेतकीरी आत्महत्या असलेल्या विदर्भात व मराठवाड्यात या डेअरीमुळे दिलासा मिळेल.या निर्णयानुसार शासकीय दूध योजना मदर डेअरीला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुढील पाच वर्षांत दोन हजार गावातील ७५ हजार दुग्ध व्यावसायिक कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ही डेअरी ३.५ लाख लिटर दूध संकलन करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच दोन हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. देशी दुधाळू गायींना पोषक अन्न देऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधात वाढ व्हावी असे प्रयत्न केले जातील. तसेच विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज व नापिकीमुळे होत असलेल्या आत्महत्या थांबविण्यासाठी या गायी शेतकऱ्यांना देऊन त्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न आहे, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)