शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संजय रायमुलकरांची जात बलई की सुतार?

By admin | Updated: February 13, 2015 02:21 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या जातीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांची जात बलई (अनुसूचित जाती) आहे की सुतार ...

नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या जातीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांची जात बलई (अनुसूचित जाती) आहे की सुतार (इतर मागासवर्गीय) हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव सरदार यांनी उपस्थित करून अकोला येथील विभागीय जात वैधता पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रलंबित तक्रारीवर चार महिन्यांत निर्णय देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीला दिले आहेत.संजय रायमुलकर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मेहकर मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. २००९ मध्ये साहेबराव सरदार त्यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. सरदार यांच्यानुसार रायमुलकर यांची जात बलई नसून सुतार आहे. कोतवाल पुस्तकात रायमुलकर यांचे आजोबा व पणजोबाची जात सुतार असल्याचे नमूद आहे. रायमुलकर यांची मुले व भावाकडे सुतार जातीचे प्रमाणपत्र आहे. यामुळे त्यांची निवडणूक अवैध आहे. सरदार यांनी २००९ मध्ये रायमुलकर यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अद्यापही निर्णय झालेला नाही. दरम्यान, सरदार यांनी रायमुलकर यांच्याविरुद्ध जात वैधता पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरही निर्णय देण्यास विलंब होत असल्याची बाब लक्षात घेता त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. तक्रारीवर निश्चित कालावधीत निर्णय देण्याचे समितीला निर्देश द्यावेत अशी त्यांची विनंती होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अशोक भंगाळे यांनी सरदार यांची याचिका निकाली काढताना पडताळणी समितीला वरीलप्रमाणे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)