शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कोरोनाचा संशयित रुग्णांचे नमुने पुण्याला गेलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या संबंधित युवकासह त्याच्या नातेवाईकाचे नमुने दुसऱ्या दिवशीही पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले नाही. हे ...

नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या संबंधित युवकासह त्याच्या नातेवाईकाचे नमुने दुसऱ्या दिवशीही पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले नाही. हे नमुने मेयोकडून शुक्रवारी पाठविले जाणार आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्टेन) आढळून आल्याने राज्यात खबरदारी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु मनपाचे या संदर्भातील युद्धपातळीवर नियोजन फसल्याचे दिसून येत आहे.

नंदनवन येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय हा युवक महिनाभरापूर्वी तो इंग्लंडला गेला होता. तो २९ नोव्हेंबरला नागपूरला परतला. लक्षणे नसल्याने त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले. याचदरम्यान तो घरात न राहता बाहेर पडला. तसेच गोंदियालाही जाऊन आला. दरम्यान लक्षणे दिसू लागल्याने त्याने १५ डिसेंबर रोजी नंदनवन येथील आरोग्य केंद्रात रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट केले. यात तो पॉझिटिव्ह आला. दरम्यान मंगळवारी कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराला गंभीरतेने घेत राज्यात अधिक सतर्कता बाळगली जात आहे. त्या अनुषंगाने मनपाच्या कोविड नियंत्रण कक्षाला या युवकाची माहिती मिळाली. मनपाच्या पथकाने बुधवारी युवकाला मेडिकलच्या विशेष वॉर्डात भर्ती केले. त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असता तो निगेटिव्ह आला. परंतु त्याचे तीन नातेवाईक पॉझिटिव्ह आले. त्यांना लक्षणे नसल्याने त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूचा संशय असल्याने तीन नातेवाईकाचे नमुने मेडिकलने काढून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे बुधवारी हस्तांतरण केले. यामुळे ते तातडीने गुरुवारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही ) त्याच्या स्ट्रेनचे स्वरुप शोधण्यासाठी पाठवणे आवश्यक होते. परंतु नमुने पाठविणार कोण, या प्रश्नावर संपूर्ण दिवस निघून गेला. अखेर हे नमुने पाठविण्याची जबाबदारी मेयोकडे देण्यात आली. शुक्रवारी हे नमुने विमानातून पुण्याला जाणार आहे. यामुळे अहवाल येण्यास आणखी एक दिवसाचा उशीर होणार आहे.

-त्या युवकाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह

रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या त्या युवकाची मेडिकलने बुधवारी आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात तो निगेटिव्ह आला. यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या अँटिजेन चाचणीच्या नमुन्यासह तीन नातेवाईकाचे नमुने पुण्याला पाठविले जाणार आहेत.