समीर जोशीला दिलासा नाही

By Admin | Updated: January 13, 2016 03:43 IST2016-01-13T03:43:58+5:302016-01-13T03:43:58+5:30

शेकडो गुंतवणूकदारांच्या घामाचा पैसा हडपणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीने नागपूर येथील प्रकरणात ...

Sameer Joshi does not have any relief | समीर जोशीला दिलासा नाही

समीर जोशीला दिलासा नाही

हायकोर्ट : जामीन अर्ज मागे घेण्याची शक्यता
नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांच्या घामाचा पैसा हडपणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीने नागपूर येथील प्रकरणात जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सत्र न्यायालयात प्रकरणातील आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित झाल्यामुळे जोशीला दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी जोशी अर्ज मागे घेण्याची शक्यता असून त्यासाठी न्यायालयाने एक आठवड्याचा वेळ दिला आहे.
अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. यापूर्वी समीरने अमरावती व अकोला येथील प्रकरणात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज खारीज करण्यात आला होता. याप्रकरणात समीर व त्याची पत्नी पल्लवी मुख्य आरोपी आहेत. उच्च न्यायालयाने पल्लवीला जामीन दिला आहे. सध्या ती बाहेर असून समीर कारागृहात आहे.
समीरने २००३ मध्ये गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही फायद्याचे प्रलोभन दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी फसविले. समीर व पल्लवी यांच्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीरला १५ आॅक्टोबर २०१३, तर पल्लवीला २९ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. समीरतर्फे अ‍ॅड. आदिल मिर्झा तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एन. बी. जवादे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Sameer Joshi does not have any relief