सलाईन गार्गल तंत्रज्ञान एमएसएमई युनिटने स्वीकारले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:43+5:302021-09-12T04:12:43+5:30

नागपूर : वेगवान गतीने काेराेना विषाणूची चाचणी करण्याचे नीरीच्या वैज्ञानिकांनी विकसित केलेले सलाईन गार्गल तंत्रज्ञानाचे हक्क एमएसएमईने स्वीकारले आहेत. ...

Saline Gargle Technology MSME Unit Accepted () | सलाईन गार्गल तंत्रज्ञान एमएसएमई युनिटने स्वीकारले ()

सलाईन गार्गल तंत्रज्ञान एमएसएमई युनिटने स्वीकारले ()

नागपूर : वेगवान गतीने काेराेना विषाणूची चाचणी करण्याचे नीरीच्या वैज्ञानिकांनी विकसित केलेले सलाईन गार्गल तंत्रज्ञानाचे हक्क एमएसएमईने स्वीकारले आहेत. नीरीने हे तंत्रज्ञान राष्ट्राला समर्पित केले आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याेग क्षेत्राद्वारे तंत्रज्ञान स्वीकारल्याने सलाईन गार्गलच्या व्यावसायिक उपयाेगाला चालना मिळणार आहे.

शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एमएसएमईने तंत्रज्ञान व्यावसायिक करण्याचे सूत्र स्वीकारले. यावेळी नीरीचे संचालक डाॅ. श्रीवरी चंद्रशेखर, डाॅ. अतुल वैद्य, तंत्रज्ञानाचे प्रणेते व नीरीच्या ईव्हीसी युनिटचे प्रमुख डाॅ. क्रिष्णा खैरनार, एमएसएमई युनिट संचालक राजेश डागा व कमलेश डागा प्रामुख्याने उपस्थित हाेते. डाॅ. खैरनार व त्यांच्या टीमने सलाईन गार्गलचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. वेगवान गतीने काेराेनाचा टेस्ट रिपाेर्ट देणाऱ्या या तंत्रामुळे नाकावाटे स्वॅब घेण्याचा त्रासही कमी केला आहे. आरएनए एक्सट्रॅक्शन किटची गरज संपविल्याने यामुळे खर्चातही कपात झाली आहे. आतापर्यंत नागपुरात ४००० च्यावर नागरिकांचे रिपाेर्ट या तंत्राद्वारे अचूक घेण्यात आले आहेत.

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता हे तंत्रज्ञान लाभदायक ठरणार आहे. नीरीने नि:शुल्कपणे हे तंत्रज्ञान एमएसएमईला दिले आहे. ज्यामुळे सरकारी तसेच खासगी आणि ग्रामविकास याेजनांच्या माध्यमातून त्याचा व्यावसायिक उपयाेग करता येईल. नागरिकांना अत्यल्प दराने त्याचा लाभ घेता येईल.

Web Title: Saline Gargle Technology MSME Unit Accepted ()