शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना बियाणे विक्री

By admin | Updated: June 18, 2016 02:21 IST

जिल्ह्यात हैदराबाद येथील एक बियाणे उत्पादक कंपनी विनापरवाना धान बियाण्यांची सर्रास विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

हैदराबाद येथील कंपनीचा प्रताप : कृषी अधिकाऱ्यांचा आशीर्वाद जीवन रामावत नागपूर जिल्ह्यात हैदराबाद येथील एक बियाणे उत्पादक कंपनी विनापरवाना धान बियाण्यांची सर्रास विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मे. सोनम सिड्स अ‍ॅण्ड टेक्नालॉजी असे त्या कंपनीचे नाव आहे. पुणे येथील कृषी आयुक्तालयाने या कंपनीला महाराष्ट्रात धान बियाण्याचे १४ वाण विक्रीस परवानगी दिली आहे. त्यात सोना राजा, सोनम-२०१, सोनम ३०६, बलवान (डीआरके), एमटीयू-१०१०, आयआर-६४, जेजीएल-१७९८, जेजीएल-३८४, बीपीटी-५२०४, एमटीयू - १००१, डब्ल्यूजीएल-१४ व एचएमटी-सोना या वाणांचा समावेश आहे. मात्र ही कंपनी या सर्व वाणांसह ‘सोना राजा गोल्ड’ या विनापरवाना धान बियाण्याची सुद्धा विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, रामटेक तालुक्यात या बियाण्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून, त्यासंबंधी ‘लोकमत’ कडे काही कृषी सेवा केंद्रांचे विक्री बिल प्राप्त झाले आहेत. दुसरीकडे या घटनेने कृषी यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वास्तविक कृषी विभागाने महिनाभरापूर्वीच अशा बोगस बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागात कृषी अधिकाऱ्यांची ७० पथके सज्ज केली आहेत. त्यांचा गवगवा सुद्धा केला आहे. मात्र या प्रकरणावरून ती सर्व पथके केवळ नावापुरती असल्याचे सिद्ध होत आहे. संबंधित कंपनीला जिल्ह्याचे परवाना अधिकारी तथा कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी जिल्ह्यात बियाणे विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर वॉच ठेवण्याची प्रथम जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. मात्र असे असताना, मोहरील यांना ‘सोना राजा गोल्ड’ या बियाण्याच्या विक्रीसंबंधी विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ‘लोकमत’ कडे पुरावा उपलब्ध असल्याचे सांगताच त्यांनी बाजू सावरली. माहिती सूत्रानुसार काही वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच ही विक्री सुरू असल्याचे सांगितले जात आहे.