शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबाचा जगण्याचा अधिकार हिरावला जात आहे

By admin | Updated: July 9, 2014 01:01 IST

नक्षल चळवळीचा मास्टरमार्इंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले प्रो. जी.एन. साईबाबा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. ते पोलिओग्रस्त असल्याने त्यांना व्हीलचेअर, शौचासाठी कमोडची

कोळसेपाटील : जामीन देण्याची मागणी नागपूर : नक्षल चळवळीचा मास्टरमार्इंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले प्रो. जी.एन. साईबाबा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. ते पोलिओग्रस्त असल्याने त्यांना व्हीलचेअर, शौचासाठी कमोडची आवश्यकता आहे. मात्र नागपूरच्या कारागृहात अपंग कैद्यांकरिता व्यवस्था नसल्याने, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावल्या जात आहे. माणूस म्हणून जगण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अन्यथा त्याला जामीन द्यावा, अशी मागणी माजी न्यायमूर्ती कोळसेपाटील यांनी पत्रपरिषदेत केली. दिल्ली विद्यापीठाने साईबाबाच्या सुटकेसाठी डिफेन्स कमिटीची स्थापना केली आहे. ही कमिटी साईबाबाच्या भेटीसाठी आज कारागृहात आली होती. या कमिटीसोबत कोळसेपाटीलसुद्धा आले होते. कारागृहात साईबाबाची व्यवस्था नीट होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. साईबाबाला दोन महिन्यापूर्वी नागपूरच्या कारागृहात आणण्यात आले. १४ दिवसांत त्याला कोर्टापुढे सादर करणे गरजेचे होते. मात्र कारागृहाजवळ व्हीलचेअर नसल्याने, पोलीस त्याला दोन महिन्यापासून कोर्टापुढे सादर करू शकले नाही. पोलिसांनी साईबाबाविरुद्ध चार्जशीट फाईल केली आहे. त्यामुळे त्याला बेलवर सोडण्यास काही हरकत नसल्याचे कोळसेपाटील म्हणाले. यावेळी साईबाबाची पत्नी वसंता उपस्थित होती. पोलिसांनी साईबाबाला कुठल्याही सर्च वॉरंटशिवाय अटक केली. त्यांचे अपहरण केल्याचा आरोप वसंता यांनी केला. साईबाबाला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास कारागृह असमर्थ असल्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला उपस्थित असलेले डिफेन्स कमिटीचे सदस्य वरावरा राव म्हणाले की, साईबाबाचे नक्षल चळवळीशी कुठलेही संबंध नाही. त्याने आपल्या साहित्यातून आदिवासींवर होणारे अत्याचार, त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्याचबरोबर सरकार संविधानानुसार कर्तव्य बजावत नसल्याची टीका त्यांनी साहित्यातून केली आहे.मात्र सरकारने त्याचा विपर्यास करून साहित्यातून मांडलेल्या विचारांना नक्षल चळवळीशी जोडले असल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)