शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सचिनला दिसला वाघोबा!

By admin | Updated: February 22, 2016 03:04 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वाघ यांच्यात दोन दिवसांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पीचवर लपाछुपीचा सामना सुरू होता.

दोन दिवस कऱ्हांडल्यात : अभयारण्यावर समाधान व्यक्तअभय लांजेवार उमरेडमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वाघ यांच्यात दोन दिवसांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पीचवर लपाछुपीचा सामना सुरू होता. शनिवारला पहाटेपासूनच अभयारण्य जवळ करणाऱ्या सचिन आणि कुटुंबीयांना वाघोबांनी दर्शन दिलेच नाही. पहिल्या दिवशी वाघोबा जिंकले. सचिनने मुक्काम ठोकला. वनविभागालाही घाम फुटला. दुसऱ्या दिवशीही वाघोबा दिसले नाही तर होणार कसे, अशा चिंतेत ‘फिल्डिंग’ लावण्यात आली. अखेरीस रविवारी सकाळी ८ वाजताच्या जंगल सफारीत तलाव परिसरात ‘चाँदी’चे दर्शन होताच सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद झळकला. पहिल्या दिवशी वाघोबा जिंकला असला तरी दुसऱ्या दिवशीच्या जंगल भ्रमंतीच्या खेळीत मात्र सचिनेच बाजी मारली. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन दिवसांच्या जंगल सफारीचा अनमोल ठेवा सचिनने साठवून ठेवत समाधान व्यक्त केले. दरम्यान, रविवारी सायंकाळी ६.३० वाजता सचिनने नागपूरकडे प्रस्थान केले.रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अभयारण्याकडे जात असताना बाहेर प्रतीक्षा करणाऱ्या काही ‘फॅन्स’ला सचिनने आॅटोग्राफही दिले. लोकेश शादी या तरुणाने ‘सर, कैसा लगा उमरेड’ असे विचारताच सचिनने हसतच ‘अच्छा लगा’ असे उत्तर दिले. जिप्सी चालक असो गाईड, पर्यटक, वाहनचालक, वनकर्मचारी यांच्यासोबतही सचिन, पत्नी अंजली, मुलगा अर्जुन यांनी छायाचित्र काढले. सेल्फीही काढल्या. दोन दिवसाच्या या भेटीत मिस्टर इंटरनॅशनलने तेवढ्याच विनम्रतेने सगळ्यांना चांगली वागणूक दिली. क्रिकेट आणि जीवनएका सामन्यात बाद झाल्यानंतर तो थांबला नाही. त्यानंतरच्या अनेक सामन्यांत जिद्दीने सामोरे गेला. मैदानावर अनेकांना घामही फोडला. मन जिंकले. क्रिकेट जिंकले अन् जगही जिंकले. क्रिकेटचा ‘भगवान’ समजल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरला मात्र शनिवारी दिवसभर दर्शनासाठी वाघोबाने जंग जंग पछाडले. वाघोबा दिसल्याशिवाय जायचेच नाही, असाच काहीसा निर्धार सचिनने केला असावा. अखेरीस आज सचिनला वाघ दिसलाच. चाँदीचे दर्शन होताच सारेच थक्क झाले. दोन दिवसांच्या जंगल सफारीचे फलित झाल्याच्या प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्यावर झळकत होत्या. क्रिकेटच्या मैदानावर तुटून पडणारा सचिन आज प्रत्यक्ष जीवनातही तेवढ्याच जिद्दीने अनेक कठीण प्रसंगांना तेवढाच सामोरे जातो, हेच या सफारीतून दिसून आले.