शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

औैषधांसाठी धावाधाव

By admin | Updated: March 2, 2015 02:24 IST

स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असताना मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या दवाखान्यात प्रतिबंधक टॅमीफ्लूच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

नागपूर : स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असताना मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या दवाखान्यात प्रतिबंधक टॅमीफ्लूच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये फारच कमी साठा उपलब्ध आहे, तर खासगी रुग्णालयांना आरोग्य विभाग किंवा मनपाकडून औषध देणे बंद केल्याची माहिती आहे. शहरात फक्त एकाच औषध विक्रेत्याकडे हे औषध उपलब्ध आहे. परिणामी, रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी धावाधाव करावी लागत आहे.रुग्णांचा जीव टांगणीलाअपुऱ्या सोयींमुळे स्वाईन फ्लूचा धोकाही वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूने ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३००वर गेली आहे. विशेष म्हणजे, नव्या निर्देशानुसार ५० खाटा असलेल्या खासगी इस्पितळांनी स्वाईन फ्लूचा स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. बहुसंख्य खासगी इस्पितळांतील हे कक्ष फुल्ल आहेत. सध्याच्या घडीला स्वाईन फ्लूचे पन्नासवर तर संशयित पाचशेवर रुग्ण विविध इस्पितळात उपचार घेत आहेत. परंतु टॅमीफ्लू औषध मिळत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. फक्त एकाच दुकानात औषध उपलब्धएका खासगी इस्पितळाच्या डॉक्टराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, गेल्या आठवड्यापासून शासकीय विभागाकडून टॅमीफ्लू औषध देणे बंद केले आहे. यातच हे औषध शेड्यूल एक्स श्रेणीत येते. यामुळे विशिष्ट खासगी दुकानातच हे औषध उपलब्ध होते. परंतु गेल्या काही दिवसांत कंपन्याकडूनच औषधांचा पुरवठा कमी झाल्याने शहरात फक्त सीताबर्डी येथील एकाच दुकानातच हे औषध उपलब्ध आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. सविता मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लू आणखी पसरण्याचा धोका वर्तविला जात आहे. परंतु आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यापासून टॅमीफ्लूची औषधे देण्यास अखडता हात घेतल्याने शासकीयसह खासगी रुग्णालये अडचणीत आले आहेत. आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून शासकीय रुग्णालयांना या औषधांचा पुरवठा होतो. परंतु गेल्या काही दिवसांत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेयो) टॅमीफ्लू औषध नव्हते. आरोग्य विभागाला मागणी करूनही वेळेवर औषध उपलब्ध होऊ शकले नाही, अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (मेडिकल) उधारीवर औषध घ्यावे लागले.(प्रतिनिधी)