शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ : विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या निरीक्षकाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 22:34 IST

शहर आरटीओ कार्यालयाच्या एका मोटार वाहन निरीक्षकाने विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन कारवाईसाठी चक्क आरटीओ कार्यालयात आणली.प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी संबंधित निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देपरिवहन आयुक्तांच्या सूचनांची अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्याना शाळेत किंवा घरी सोडून दिल्यावरच स्कूल बस किंवा व्हॅनवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश असताना शहर आरटीओ कार्यालयाच्या एका मोटार वाहन निरीक्षकाने विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन कारवाईसाठी चक्क आरटीओ कार्यालयात आणली. यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ ताटळत रहावे लागले, याची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी संबंधित निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.विशेष म्हणजे, बुधवारी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी कार्यालयाला दिलेल्या भेटीत ज्या सूचना केल्या त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्कूल बस, अवैध वाहतूक, अवैध जडवाहतूक तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. 

मोटार वाहन निरीक्षक वासुदेव मुगल यांनी बुधवारी भवन्स, सिव्हील लाईन्स येथील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एमएच- ३१, डीएस- ५१९७ क्रमांकाच्या स्कूलव्हॅनची दुपारी ३- ३.३० च्या सुमारास तपासणी केली. व्हॅन चालकांकडून नियमांची कुठेच अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विद्यार्थ्यांसह व्हॅन आरटीओ कार्यालयात जप्त करण्यासाठी आणली. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना घरी पोहचविणे आवश्यक होते. घरी जायला विलंब होत असल्याने वाहनातील लहान मुले रडू लागली. वाहन चालकाने वाहनाच्या कागदपत्रासह त्याचा परवाना देत मुलांना सोडून लगेच परत येत असल्याचे अधिकाऱ्याला सांगितले. परंतु अधिकाऱ्याने न ऐकता मुलाला दुसऱ्या वाहनातून सोडण्याचा हट्ट धरत त्यांना ताटकळत ठेवले. ही माहिती उपस्थितांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना दिली.त्यांनी तातडीने मुगल यांना त्या वाहनात बसून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी सोडल्यावर कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर विद्यार्थी घरी पोहचले. सूत्रानूसार, मुगल यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशीही सुरू आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.प्रादेशिक परिवहन अधिकारी मनवर यांनी मात्र या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच मनवर यांनी आपल्या सर्व अधिकारी व मोटार वाहन निरीक्षकांना स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करताना मुलांना शाळेत सोडल्यावर किंवा घरी सोडल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या.ओव्हरलोडवर कारवाईक्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करणाऱ्या (ओव्हरलोड) वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू करण्याचे निर्देश गुरुवारी सर्व अधिकारी व मोटार वाहन निरीक्षकांना दिले. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसलेल्या विशेषत: ऑटोचालकांवर कारवाई करण्याचे व स्कूल बस व व्हॅन तपासणी मोहिमेला गती देण्याचा सूचनाही त्यांनी केल्या.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर