सुमेध वाघमारे नागपूर नागपूर विभागात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. गाड्या वाढल्या, कामाचा व्यापही वाढतोय आणि दुसरीकडे कर्मचारी दिवसेंदिवस कमी होत आहेत, अशा विचित्र कात्रीत नागपूर विभागातील ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) सापडली आहेत. तब्बल ४२ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. वर्षानुवर्षे ही पदे भरली जात नसल्याने आरटीओतील कामाची गती मंदावली आहे. विशेषत: या विभागांतर्गत येणाऱ्या पाच आरटीओ कार्यालयात सहायक मोटार वाहन निरीक्षकांची ८० टक्के पदे रिक्त आहेत.नागपूर विभाग ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत नागपूर ग्रामीण, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा ही पाच आरटीओ कार्यालये येतात. नागपूर विभागात दिवसाला सुमारे ३०० नवीन वाहनांची नोंद होते. यातील सर्वाधिक वाहनांची नोंद नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात होते. वर्षभरात साधारण १० लाख वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे आरटीओच्या कामाचा प्रचंड व्याप वाढला आहे. मात्र, त्यातुलनेत कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा आहे. अनेक वर्षांत रिक्त झालेली कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नाहीत. परिणामी याचा फटका कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसत असून दलाल याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये ४२ पदे रिक्तसर्वात जास्त महसूल गोळा करणाऱ्या नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात ४२ पदे रिक्त आहेत. कार्यालयात ११९ पदे मंजूर असताना केवळ ७७ पदे भरण्यात आली आहेत. विशेषत: उपप्रादेशिक परिवहन अधिकारीचे एक पद, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे दोन पद, मोटार वाहन निरीक्षकाचे सहा तर सहायक मोटार वाहन निरीक्षकाची १२ पदे रिक्त आहेत. परिणामी, प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. यातच कार्यालयात सोयी नसल्याने प्रलंबित कामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.चंद्रपूर आरटीओमध्ये ५० टक्क्यांवर पदे रिक्तइतर आरटीओ कार्यालयाच्या तुलनेत चंद्रपूर आरटीओमध्ये सर्वात जास्त पदे रिक्त आहेत. ५० टक्के पदे रिक्त असल्याने याचा परिणाम रोजच्या कामावर होत आहे. या कार्यालयासाठी ६७ पदे मंजूर असताना ३३ पदे भरण्यात आली आहेत. ३४ पदे रिक्त आहेत. या कार्यालयातही सहायक मोटार वाहन निरीक्षकांची २९ पदे मंजूर असताना केवळ तीन पदे भरण्यात आली आहेत.
आरटीओत कर्मचाऱ्यांचा दुष्काळ
By admin | Updated: June 10, 2015 03:05 IST
नागपूर विभागात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. गाड्या वाढल्या, कामाचा व्यापही वाढतोय आणि दुसरीकडे कर्मचारी दिवसेंदिवस कमी होत आहेत,
आरटीओत कर्मचाऱ्यांचा दुष्काळ
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}