शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कलावंत घडविण्यासाठी कलासंस्थांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: January 13, 2016 03:42 IST

सर्वांमध्ये काहीतरी कलागुण असतात. या कलागुणांना प्रगट करण्यासाठी माध्यमांची गरज असते.

कांचन गडकरी : कलार्जन महास्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळानागपूर : सर्वांमध्ये काहीतरी कलागुण असतात. या कलागुणांना प्रगट करण्यासाठी माध्यमांची गरज असते. कला संस्थांनी अशा कलावंतांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यास, आपल्यातूनच एखादा चांगल्या कलावंताची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे कलावंत घडविण्यासाठी कलासंस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी यांनी व्यक्त केले. कलार्जन फाऊंडेशन, स्वराज जनकल्याणकारी ग्रामीण विकास संस्था व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कलार्जन महास्पर्धेचे आयोजन यशवंत स्टेडियमवर करण्यात आले होते. यात चित्रकला, रांगोळी, मेहंदी व लिखो मन की बात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण सोहळा कांचन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पार पडला. या कार्यक्रमाला कीर्तीदा अजमेरा, महापालिकेचे शिक्षण सभापती गोपाल बोहरे, नगरसेविका रश्मी फडणवीस, सारिका नांदूरकर, बंडू राऊत यांच्यासह सुनिता धोटे, स्नेहा मोहिते, मनोज धोटे, पोलीस निरीक्षक माने, सुनिल वाघमारे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत ५ हजारावर स्पर्धकांनी भाग घेऊन, आपल्यातील कला प्रदर्शित केल्या होत्या. स्पर्धकांनी साकारलेल्या कलाकृतीचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी चार गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. अ गटात प्रशम थुल, ब गटात खुशी गंगोत्री, क गटात आरती पटेल, ड गटात अनुष्का चंदा व महाविद्यालयीन गटात मनोज चोपडे यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला. तर मतिमंद गटात सागर नागोरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. रांगोळी स्पर्धेत वयस्क गटात प्रतिमा हंबरडे, युवकांच्या गटात योगेश हेडाऊ व शालेय गटात रुपाली फाले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या पुरस्कर्त्यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व रोख देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)