शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहाजवळ लुटमार

By admin | Updated: January 4, 2017 02:00 IST

मध्यवर्ती कारागृहाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला मारहाण करून एका आरोपीने ३२ हजार ५०० रुपये लुटून नेले.

भरदिवसा घडली घटना : निवृत्त कर्मचाऱ्याची रक्कम लुटली नागपूर : मध्यवर्ती कारागृहाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला मारहाण करून एका आरोपीने ३२ हजार ५०० रुपये लुटून नेले. सोमवारी दुपारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. नानाजी धनाजी इंगळे (वय ५९) असे तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव आहे. इंगळे गेल्या वर्षी कारागृह सेवेतून निवृत्त झाले. सध्या ते कारागृहाशेजारी असलेल्या कर्मचारी निवासातच राहतात. त्यांना घराचे बांधकाम करायचे असल्यामुळे त्यांनी सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास बँक आॅफ महाराष्ट्रमधून २४ हजार रुपये काढले. त्यांच्या जवळ ८५०० रुपये होते. अशा प्रकारे एकूण ३२,५०० रुपये खिशात घालून ते सायकलने आपल्या निवासस्थानाकडे निघाले. कारागृहाच्या मुख्य दारातून विश्रामगृहाजवळच्या मैदानापासून घराकडे जात असताना अचानक एका आरोपीने त्यांना रोखले. मारहाण करून आरोपीने इंगळे यांच्या खिशातील ३२ हजार ५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. झटापटीत इंगळे यांचा खिसाही फाटला. आरोपीने रस्त्यावर आपली मोटरसायकल ठेवली होती. रक्कम हातात येताच ती सुरू करून आरोपी पळून गेला. इंगळे यांनी आरडाओरड करीत कारागृहासमोरच्या रक्षकांना ही माहिती दिली. मात्र, ते रस्त्यावर येईपर्यंत आरोपी नजरेआड झाला होता. नेहमी मोठा बंदोबस्त असणाऱ्या कारागृहाजवळ भरदिवसा ही लुटमारीची घटना घडल्याने खळबळ उडाली. इंगळे यांनी धंतोली ठाण्यात माहिती कळविताच पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी बँकेतूनच इंगळे यांच्यावर नजर ठेवून होता, हे स्पष्ट झाले. त्याने तेथून पाठलाग करून इंगळेंना निर्जन ठिकाणी गाठले आणि त्यांची रक्कम हिसकावून घेतली. इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोटरसायकलवर मागे बिना नंबरची प्लेट होती. त्यामुळे हा गुन्हेगार सराईत असावा, असा अंदाज काढण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.