शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

कुंटणखान्यावर अनेकांची लूट

By admin | Updated: July 12, 2015 03:00 IST

या टोळीचे कुंटणखाने शहरातील विविध भागात आहेत. त्यासाठी त्यांनी एमआयडीसी, हिंगणा, गोधनी, बेसा, इसासनी, बेलतरोडी आदी भागात ...

कुंटणखान्यावर आढळली तोतया पोलिसांची टोळी नागपूर : या टोळीचे कुंटणखाने शहरातील विविध भागात आहेत. त्यासाठी त्यांनी एमआयडीसी, हिंगणा, गोधनी, बेसा, इसासनी, बेलतरोडी आदी भागात पॉश फ्लॅट भाड्याने घेऊन ठेवले आहेत. या टोळीकडे अनेक श्रीमंत ग्राहकांची यादी असून, शहर तसेच शहराबाहेरच्या अनेक वारांगनांची नावे, फोटो आणि संपर्क क्रमांक आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी अशा प्रकारे ६० ते ७० आंबटशौकिनांना लाखोंचा गंडा घातला असल्याचे पोलीस सांगतात. बदनामीच्या धाकामुळे पीडित व्यक्ती पोलीसच काय मित्रांकडेहीआपबिती सांगण्याची हिंमत दाखवत नव्हता. या टोळीकडून बरीच धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता पोलीस अधिकारी वर्तवित आहेत. टोळीतील सदस्य चंद्रप्रकाश विनायक वारवतकर (वय ४७, रा. मानेवाडा, हुडकेश्वर), अमोल मनोरंजन पाटील (वय २५, रा. आदिवासीनगर,संत सावता हायस्कूल जवळ), सारिका महेश पांडे (वय ३०, रा. जयताळा, आखरी बस स्टॉप, शिवप्रिया टॉवर, एमआयडीसी) आणि ज्योती शशांक कापसे तसेच अन्य पाच सदस्य. त्यापैकी वारवतकर हा माजी सैनिक. बहुतांश जणांकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र आणि मुद्रांकही (स्टॅम्प) होते. वारवतकर हा इन्स्पेक्टरच्या थाटात वावरायचा. ही पक्की माहिती कळताच पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अरिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव पोवार यांनी शनिवारी दुपारी सापळा रचून जयताळ्यातील सारिका पांडेच्या कुंटणखान्यावर धाड घातली. अशी आहे पद्धतसारिका ग्राहकाला बोलवायची. महिलेसोबत तो खोलीत जाताच ती महिला किंवा मुलगी खोकलायची. हा इशारा मिळताच बाजूला दबा धरून बसलेले कुंटणखान्यावर धाड घालायचे. सापळ्यात अडकलेल्या व्यक्ती/ तरुणाचे नाव, पत्ता, संपर्कक्रमांक लिहून घेतल्यानंतर लगेच पत्रकारांना बोलावण्याची मखलाशी हे तोतया पोलीस करीत होते. बदनामीच्या धाकाने पीडित व्यक्ती गयावया करायचा. वेश्याव्यवसाय करणारी महिला / तरुणीच ‘मांडवली‘ करायची. अशा प्रकारे एका ग्राहकाकडून ३ ते ४ लाख रुपये हडपले जात होते.