हे नागपूरचे रस्ते आहेत पण जरा वाकडे आहेत!

By Admin | Updated: April 25, 2016 02:38 IST2016-04-25T02:38:17+5:302016-04-25T02:38:17+5:30

पंचशील चौकातून वर्धा रोडने जायचे असेल तर वाहनचालकांना जरा जपूनच वाहने चालवावी लागत आहेत.

This is the road to Nagpur but it is a little strange! | हे नागपूरचे रस्ते आहेत पण जरा वाकडे आहेत!

हे नागपूरचे रस्ते आहेत पण जरा वाकडे आहेत!

निकृष्ट डांबरीकरणामुळे अपघात :
पंचशील चौक ते साई मंदिर रस्ता धोकादायक

राजीव सिंह नागपूर
पंचशील चौकातून वर्धा रोडने जायचे असेल तर वाहनचालकांना जरा जपूनच वाहने चालवावी लागत आहेत. पंचशील चौक ते साई मंदिर दरम्यानच्या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्याने हा रस्ता गुटगुटीत दिसत असला तरी समतल नसल्याने या मार्गावर अपघात वाढले आहेत. त्यामुळे जीव वाचण्यासाठी वाहनचालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
मार्गाच्या अर्धवट डांबरीकरणामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. शहरातील अनेक रस्त्यांची कामे अशीच होत असल्याने, रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर नियंत्रण कुणाचे? त्यांना रस्त्यांच्या अर्धवट कामाचे कंत्राट कसे देण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्धा मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या श्रेणीत येतो.

Web Title: This is the road to Nagpur but it is a little strange!