वन विभागातील गार्ड झाले आरएफओ!

By Admin | Updated: May 13, 2014 01:00 IST2014-05-13T01:00:28+5:302014-05-13T01:00:28+5:30

वन विभागात सध्या सुरू असलेला ‘वर्किंंग प्लॅन’चा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या विभागात वन परिक्षेत्र अधिकारी

RFO became a guard in forest department! | वन विभागातील गार्ड झाले आरएफओ!

वन विभागातील गार्ड झाले आरएफओ!

नागपूर : वन विभागात सध्या सुरू असलेला वर्किंंग प्लॅनचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या विभागात वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) नसल्याने वनरक्षक (गार्ड) व वनमजूर स्पॉट मॅपिंगचे काम करून, त्याआधारे वर्किंंग प्लॅन तयार केले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वर्किंंग प्लॅनवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणत्याही जंगलाच्या विकासासाठी वर्किंंग प्लॅनहा महत्त्वाचा मानल्या जातो. त्यामुळे प्रत्येक प्रादेशिक विभागाचा स्वतंत्र प्लॅन तयार केला जातो. यातून संबंधित वन परिक्षेत्रामध्ये पुढील दहा वर्षांंंत जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा तयार केला जातो. त्यामुळे तो शास्त्रोक्त पद्धतीने तयार व्हावा, यासाठी वन परिक्षेत्र अधिकार्‍यांच्या माध्यमातून संबंधित वन परिक्षेत्राचे तंतोतंत मोजमाप (स्पॉट मॅपिंग) केल्या जाते. यात संबंधित वन परिक्षेत्राचे क्षेत्रफळ, येथील झाडांची घनता व इतर बाबींची नोंद घेऊ न त्याआधारे प्लॅन तयार केला जातो. परंतु सध्या नागपूर विभागीय वर्किंंग प्लॅन कार्यालयात एकही वन परिक्षेत्र अधिकारी नसल्याने वनरक्षक व वनमजूर स्पॉट मॅपिंगचे काम पूर्ण करीत असल्याची माहिती आहे. या कार्यालयातील वन परिक्षेत्र अधिकारी एम. के. चाटी यांनी येथे रुजू होताच, दोन महिन्यात तिरोडा येथे स्वत:ची बदली करून घेतली. शिवाय दुसरे आरएफओ शेळके सहा महिन्यांपूर्वी सेवानवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्या या विभागातील दोन्ही पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयावर नागपूरसह वर्धा, गोंदिया व भंडारा या चार विभागाचा वर्किंंंग प्लॅन तयार करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी या कार्यालयाचे प्रमुख असलेल्या वनसंरक्षकांच्या (सीएफ) मदतीला दोन आरएफओ, एक क्षेत्र सर्वेअर व तीन सर्वेअरची पदे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)

यामुळे थेट वन विभागाच्या

Web Title: RFO became a guard in forest department!