शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळमध्ये फळे महागच!

By admin | Updated: September 19, 2014 00:55 IST

सध्या कळमन्यात आरोग्याला पोषक अशा फळांची आवक वाढली आहे. तुलनेत भावही कमी आहेत. सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री सामान्यांना परवडेल, अशा किमतीत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी

सफरचंद, डाळिंबाची प्रचंड आवक : भाव आटोक्यातनागपूर : सध्या कळमन्यात आरोग्याला पोषक अशा फळांची आवक वाढली आहे. तुलनेत भावही कमी आहेत. सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री सामान्यांना परवडेल, अशा किमतीत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणांमध्ये दरवाढीची शक्यता नाही, अशी माहिती विक्रेते पेंढारकर यांनी दिली. सफरचंद स्वस्तचमध्यंतरी पावसामुळे कळमन्यात सफरचंदची आवक अपेक्षेपेक्षा जास्त होती. सिमला येथून माल विक्रीस आला. २५ किलो पॅकिंगचा भाव दर्जानुसार ८०० ते १२०० रुपयांदरम्यान होता. ही स्वस्ताई ८ ते १० दिवसच राहिली. सध्या काश्मिरात वाहतूक खुली झाली आहे. लवकरच देशात सर्वत्र माल पोहोचविला जाईल. सध्या दिल्ली आणि चंदीगड येथून दररोज सफरचंदचे पाच ते सहा ट्रक कळमन्यात येत आहेत. भाव १३०० ते १७०० रुपयांदरम्यान आहेत. याशिवाय पावसाचा फटका डाळिंबाला बसल्याने मध्यंतरी आवक वाढली होती. शिवाय भावही उतरले होते. सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून दररोज २० ते २५ गाड्यांची आवक आहे. ठोकमध्ये ६०० ते ७५० (१० किलो) रुपयादरम्यान भाव आहेत. मोसंबीची आवक वाढलीकळमन्यात संपूर्ण विदर्भातून मोसंबी विक्रीस येत आहे. भाव टनानुसार आहेत. किलोनुसार १५ ते २० रुपये किलो भाव आहे. दररोज १ ते ३ टन मोसंबीचे ७० ते ७५ मेटॅडोर विक्रीस येत आहेत. तुलनेत संत्र्याची आवक कमी आहे. पाऊस नसल्याने आंबिया बारला आता सुरुवात झाली आहे. काटोल, कळमेश्वर, कोंढाळी या भागातून काही शेतकरी संत्रा आणीत आहेत. विक्री टनानुसार होत असली तरीही भाव दर्जानुसार १० ते १५ रुपये किलो आहे. दररोज दोन हजार डबे (१० किलो पॅकिंग) चिकू डहाणू (पालघर) येथून कळमन्यात येत आहेत. भाव १२० ते ४०० रुपयांदरम्यान (१० किलो) आहेत. चिनी ‘फ्यूजी’ला मागणीविदेशात उत्पादित होणाऱ्या फळांची चव नागपूरकरांच्या जीभेवर रेंगाळू लागली आहे. विदेशातून आयातीत होणाऱ्या फळांच्या मागणीत वाढ होत आहे. कळमन्यात आयात फळांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुंबई येथे ही फळे उतरविली जातात. तेथून ती कळमन्यात आणली जातात. आयात फळांमध्ये सफरचंदाचे प्रमाण जास्त आहे. चीनमधील ‘फ्यूजी’ सफरचंद मागणीनुसार विक्रेते मागवित आहेत. अनेक आजारांवर ही फळे उपयोगी ठरत असल्याने ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. तुलनेने कमी भाव व आकर्षक पॅकेजिंग हेसुद्धा त्यातील एक मुख्य कारण आहे. फळांचा दर्जाही चांगला आहे. (प्रतिनिधी)