शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

व्यस्त अधिकाऱ्यांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढविण्याबरोबरच त्यांचे आरोग्य, शिक्षक, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढविण्याबरोबरच त्यांचे आरोग्य, शिक्षक, सामाजिक अस्तित्व सक्षम करण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हे केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांना या अभियानाचे नोडल अधिकारी बनविण्यात आले आहे.

आधीच कामात व्यस्त असणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांसाठी फिल्डवर उतरून हे अभियान यशस्वी करणे ‘चॅलेंज’ ठरणार आहे. नोडल अधिकारी म्हणून ११ महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे या अभियानातील भरपूर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. काही तालुक्यात १ अधिकारी तर काही अधिकाऱ्यांना २ ते ३ तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी, त्यांचे शिक्षण व आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी टाकलेले हे पाऊल महत्वाचे आहे. नोडल अधिकारी म्हणून या अधिकाऱ्यांना लिंग निवडीला प्रतिंबध घालणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री करणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबाबत खात्री करणे, पीसीपीएनडीटी कायद्याची जनजागृती करणे, स्त्रीभ्रूण हत्येला प्रतिबंध घालणे, योजनेचा प्रसार शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा येथे जावून करणे, मुली व महिलांमध्ये अ‍ॅनिमिया व आरोग्यविषयक बाबींची जनजागृती करणे, ब्लॉक टास्क फोर्सच्या माध्यमातून तालुका स्तरावर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, सर्व समूह, समाज संघटनांना एकत्र करून त्यांचा प्रभावी वापर करून घेणे आदी कर्तव्य या अधिकाऱ्यांना बजावायचे आहे.

विशेष म्हणजे या अभियानातील सर्व जबाबदाऱ्या प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अंमलबजावणी करून घ्यायची आहे. एकीकडे प्रशासनात वाढलेल्या अतिरिक्त कामात व्यस्त असलेल्या या अधिकाऱ्यांसाठी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे आव्हानात्मक ठरणार आहे.