३९ गुरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:13 IST2020-11-28T04:13:09+5:302020-11-28T04:13:09+5:30

माैदा : पाेलिसांनी वडाेदा शिवारात गुरुवारी (दि. २६) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये ३९ गुरांची सुटका केली. या ...

Release of 39 cattle | ३९ गुरांची सुटका

३९ गुरांची सुटका

माैदा : पाेलिसांनी वडाेदा शिवारात गुरुवारी (दि. २६) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये ३९ गुरांची सुटका केली. या गुरांची एकूण किंमत ३ लाख २७ हजार १०० रुपये असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

माैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना वडाेदा (ता. कामठी) शिवारातील कालव्याच्या काठी काही जनावरे बांधली असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी केली असता तिथे त्यांना ३९ जनावरे चाऱ्यापाण्यावाचून बांधून ठेवली असल्याचे लक्षात आले. ती जनावरे कत्तलखान्यात नेली जात असावी अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याने तसेच त्या गुरांवर कुणीही मालकी न सांगितल्याने पाेलिसांनी त्यांची लगेच सुटका केली आणि त्यांना खैरी (पिंपळगाव), ता. लाखनी, जिल्हा भंडारा येथील गाेरक्षणामध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. त्या गुरांची एकूण किंमत ३ लाख २७ हजार १०० रुपये असल्याची माहिती ठाणेदार मधुकर गीते यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार जंगवाड करीत आहेत.

Web Title: Release of 39 cattle