शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गाणारांच्या उमेदवारीवर भाजपात चिंतन

By admin | Updated: January 11, 2017 03:03 IST

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विरोधकांशी दोन हात करण्याची वेळ असताना भाजपमध्ये उमेदवारीवरूनच वादळ उठले आहे.

-तर प्रचार करणार नाही : संघ परिवार, शिक्षक परिषद व व्हीएचपीचा विरोध नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विरोधकांशी दोन हात करण्याची वेळ असताना भाजपमध्ये उमेदवारीवरूनच वादळ उठले आहे. भाजप व शिक्षक परिषदेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे नागो गाणार यांचे नाव उमेदवारीसाठी समोर करण्यात आल्यामुळे संघ परिवार, शिक्षक परिषदेचा नागपूर विभाग तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून गाणारांना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. परिवारातील संघटनांच्या या भूमिकेमुळे भाजपची चिंता वाढली असून गाणारांची उमेदवारी बदलण्यावर चिंतन सुरू झाले आहे. गाणार यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच परिवारातूनच विरोध होत आहे. आता हा विरोध टोकाला गेला आहे. आजवर पडद्यामागे व्यक्त केली जाणारी नाराजी आता उघडपणे व्यक्त केली जात आहे. स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असलेले शिक्षक मतदार उघडपणे फिरून गाणारांविरोधात प्रचार करीत असल्याचे चित्र आहे. गाणार यांच्या कार्यकाळात परिवारातील संस्थांनाच अधिक त्रास झाला, शिक्षक परिषदेला गाणार यांनी कुठलीही मदत केली नाही, असे उघड मत कार्यकर्ते मांडत आहेत. एवढे करूनही गाणार यांना भाजपने तिकीट दिले तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरशी संबंधित असलेली ही जागा भाजपला गमवावी लागेल, अशी टोकाची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. उघड नाराजीमुळे भाजपमध्येही गाणारांच्या उमेदवारीवर चिंतन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एवढ्या विरोधानंतरही गाणार यांना उमेदवारी देण्यापेक्षा दुसरा चेहरा देण्याचा किंवा परिवारातील रिंगणात असलेल्या दुसऱ्या उमेदवारालाच अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्यास सांगावे, असा विचार पक्षात सुरू झाला आहे. नागपूरची जागा असल्यामुळे भाजपच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अशात ही जागा गमावून विरोधकांना बळ देण्यापेक्षा कुठलाही कठोर निर्णय भाजपतर्फे घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.(प्रतिनिधी)